चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा.
प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा.
सांगा पाहू
आमची नावे सांगा.
आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी.
० खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी.
आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी.
० खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी.
० आमचा संचार कुठे असतो ?
गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.
० आमचे रग निरनिराळे
बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर
रंगबेरंगी असतो.
० आम्ही आकाराने लहान-मोठे!
घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात.
उंदीर आणि खार लहान असतात.
गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात.
गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात.
सांगा पाहू
० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?
० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ?
० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ?
० आमची हालचाल वेगवेगळी
खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते.
खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते.
हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू
शकत नाही.
हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते.
हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते.
बेडकाचे मागचे पाय लांब असतात.
त्यामुळे दुणटुण उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते.
सांगा पाहू.
० आपण गाई का पालतो?
० आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा.
० आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा.
० घरात उंदीर आणि ढेकूण असतील, तर आपल्याला का आवडत नाही ?
० आम्ही उपयोगी !
आपण प्रेमाने प्राणी पाळतो
कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांज़रेही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात.
काहीजण कोंबड्या पाळतात. मांस, दूध , अंडी मटण हे खाद्यपदार्थ
प्राण्यांपासूनच मिळतात.
बैल शेतीच्या कामात मदत करतात.
गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही-जण घोडे
किंवा गाढवे पाळतात. ॰ आपण पाळलेल्या प्राण्याची निगा ठेवतो. ' त्यांना खाऊपिऊ घालतो. ते आजारी
पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात
आम्ही घरघुशे!
काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी
साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निरालेच !
घरात ढेकूण होतात. आपले रक्त शोषतात. कोळ्यांमुळे घरात जळमटे
होतात.
डास, माश्या, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास
होतो.
असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे.
भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले ; पण है झाले वरवरच्या
निरीक्षणातून पाडलेले गट.
वैज्ञानिक ज्या वेळी प्राण्यांचे गट पाडतात त्या वेळी ते यापेक्षा
अधिक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतात. कसा ते पाहूया
० आमची पिल्ले दूध पितात.
गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची
पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात.
या 'प्राण्यांना
चार पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात.
० आम्ही उडतो
पक्ष्यांना दोनच प्राय असतात. उडण्यासाठी दोन पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात.
वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड़ आकाशात उंच भरा-या घेऊ शकतो, उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो. खालीही लगेच येतो.

० आम्ही पाण्यात राहतो.
निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात.
माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता
येते. माशांच्या अंगावर खवले असतात.
माहीत आहे का तुम्हाला?
माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो.
माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो.
० आम्ही सरपटतो.
सरडे, पाली आणि
साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणा-या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात.
सरडे आणि पाली यांना चार प्राय असतात. ते खुपच आखूड असतात.
सापाला तर पायच नसतात.
सरडे आणि पाली यांना चार प्राय असतात. ते खुपच आखूड असतात.
सापाला तर पायच नसतात.
० आम्हाला कींटक म्हणतात.
फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत
नाही.ते कीटक अाहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा अाकाराने लहान असतात. शिवाय त्यांना
सहा पाय असतात.
सहा प्राय असणा-या ' प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून
फुलपाखरे कीटक आहेत.
डास, माश्या, झुरळे हेही कीटकच आहेत.
माहीत आहे का तुम्हाला ?
वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात.
त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी
नाहीत.
त्यांचा समावेश गाय, वाघ, हरीण आणि उंदीर यांच्या गटात होतो.
जरा डोके चालवा.
पुढीलपैको कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांज़र या प्राण्यांचा
समावेश कराल ?
गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर (आमची पिल्ले
दूध पितात.) -----------------
कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा (आम्ही उडतो.)
-------------
सरडा, पाल आणि
साप (आम्ही सरपटतो.) ------------------
ही झाली आपल्याला ठाऊक असणा-या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण
आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत.
प्राण्यांचे रंग, रूप, आकार यांमध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यांतही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात.
प्राण्यांचे रंग, रूप, आकार यांमध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यांतही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात.
समुद्रात राहणा-या प्राण्यांची संख्या तर जमिनीवर राहणा-या
प्राण्यांपेक्षा फार प्रचंड आहे. त्यांच्यात खूप विविधताही आहे. अशा सर्व
प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात, की ती माहिती तुम्ही जरूर
मिळवा.
आपण काय शिकलो ?
अवकाश, जमीन आणि
पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो.
रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते.
रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते.
काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो. असे प्राणी आपण पाळतो.
काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो.
प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात.
प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
विविधता हा निसर्गाचा नियम आहे.
Comments
Post a Comment