Skip to main content

21 समूहजीवणासाठी सार्वजनिक व्यवस्था



21 समूहजीवणासाठी सार्वजनिक व्यवस्था

सांगा पाहू

० वरील चित्रांच्या आधारे सार्वजनिक सोई व सुविधा यांची यादी तयार करा. या सुविधांचा आपल्याला कोणता फायदा होतो?
० या सुविधा नसतील, तर कोणत्या अडचणी येतील
आपले कुटुंब हे आपले घर असते.घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते. सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते. सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वासाठी असणा-या सोई.वाहतूक,शाळा,दवाखाने यांसारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो.सार्वजनिक सेवासुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात.त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे.
स्थानिक शासन आणि गावातील सुविधा

आपण गावात किंवा शहरात  राहतो.गावाची लोकसंख्या कमी असते.शहरातील लोकसंख्या जास्त असते.शहरात कारखाने जास्त असतात.बाजार पेठा असतात.तिथे रोजगाराच्या संधी जास्त असतात.सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात.
गाव असो कि शहर , तेथील कारभार तिथेच असणारी शासन संस्था पाहते.तिला आपण स्थानिक शासन संस्था म्हणतो.
गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते.
नगराचा कारभार नगरपालिका पाहते.
मोठ्या शहरासाठी महानगरपालिका असते.
pg124

माहित आहे का तुम्हाला.
प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.त्यावेळी महाराष्ट्रात २१६३६ ग्रामपंचायती होत्या. ती संख्या २०१० अखेर २७९९३ इतकी झाली.ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या ५०० इतकी आवश्यक आहे.५०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन-तीन गावांची मिळून ग्रामपंचायत बनते.
करून पहा.
वरीलपैकीं कोणते स्थानिक शासन तुमच्या गावात किंवा शहरात आहे? स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणत्या सेवा देते,याची सूची करा.

सांगा पाहू
वरील चित्रांतून आपल्याला आपल्या गावात असणा-या सुविधा दिसतात.याव्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात?
सार्वजनिक सेवासुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात.
त्याचा वापर आपण काजीपूर्वक केला पाहिजे.सार्वजनिक सोई-सुविधांवर ताण येतो.पण आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो.
पाणीपुरावठा,सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते,परंतु त्यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते.आपल्या गावात तुम्ही बँक पहिली असेल.खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आई-वडील बँकेत ठेवतात.तिथे पैसे सुरक्षित राहतात.पैशांची बचत होते.गरज लागेल , तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढता येतात.गरजू लोकांना बँक कर्जही देते.


pg125

नातेवाईक शी व मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी तपाल्सेवेचा उपयोग होतो.जगभरात कोठेही आपल्याला पत्र पाठवता येते.
एखादद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात.आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात.त्यांनुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा, हे ठरवितात.तो उभा करण्यासाठी आपल्याजवळचे थोडे पैसेही एकत्र जमा करतात.त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात.लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात.

माहीत आहे का तुम्हाला.

पुष्टि चारशे वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढीलप्रमाणे होती : गोवलकोंडा येथे प्रत्येक दोन-तीन मैलाच्या अंतरावर झोपड्या असत.पहिल्या झोपडीत एक हरकार म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य.पहिला हरकार पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी नेऊन दुस-या झोपडीत टाके.तेहते दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार असे.तो हरकारा ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके.

टपाल नेध्याची व्यवस्था अशा रीतीने वेस्ली जात असे.या व्यवस्थेलाच ‘डाक व्यवस्था’म्हणत.
काय करावे बरे?
नळांना तोटया नसल्याने पाणी वाया जाते.
या समस्येवर अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या एका शाळेतील बालसंसद्रेने एक उपक्रमकेला. वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरु केली.काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्याने पाही वाया जाते हा मुद्दा मांडला.मुलांनी नळाला तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते , हे समजून घेतले.मग नळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह ग्रामपंचायत कडे धरण्याचे बाल संसदेने ठरवले.मुलांनी नळांना तोट्या बसवण्याबाबत पत्र ग्रामपंचायतीला दिले.काही दिवसांनी एक स्मरणपत्र हि पाठवले. आणखी काही दिवसांनी नळाला तोट्या बसवण्यात आल्या.मुलांनी समस्येचे निराकरण केले.
·         पाण्यासंबंधी च्या समस्येचे निराकरण तुम्ही कसे कराल?

आपण काय शिकलो.
·         सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणा-या सोई.
·         गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते.
·         नगराचा कारभार नगरपालिका पाहते.
·         मोठ्या शहरासाठी महानगरपालिका असते.
·         सार्वजनिक सेवासुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
·         बँकेत पैसे सुरक्षित रहातात.
·         आपल्याला जगभरात कोठेही पत्र पाठवता येते.
·         लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह