सांगा पाहू
० पुढील कोड़े तुम्ही नक्की सोडवू शकाल.
चोहीकडे पसरली आहे । तुमच्या अाजूबाजूला । ।
दिसत नाही डोळ्यांना । लागत नाही हाताला । ।
आहे तरी कोण मी ? येईल का ओळखायला ?
दिसत नाही डोळ्यांना । लागत नाही हाताला । ।
आहे तरी कोण मी ? येईल का ओळखायला ?
करून पहा.
फुगा फुगवला. फुगा का मोठा झाला ? फुग्यात तुम्ही काय भरता ?
हवा आपल्या अवतीभवती पसरली आहे. हवा अाहे हे आपल्याला जाणवते पण ती
आपल्याला दिसत नाही. हवेला रंग, वास आणि चव नसते.
० नवा शब्द शिका !
श्वास : नाकाने आपण हवा आत घेतो. त्याला 'श्वास घेणे' म्हणतात.
उच्छवास : नाकाने हवा बाहेर टाकतो. त्याला 'उच्छ्वास सोडणे' म्हणतात.
श्वसन : श्वास आणि उच्छवास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छवास होतो.
आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो. त्याला 'श्वसन’ असे म्हणतात.
सांगा पाहू
शांत झोपलेल्या माणसाची छाती वर-खाली होताना का
दिसते?
० आपण श्वासोच्छ्वास का करतो?
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे.
त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते.
श्वास घेताना आपण हवा आत घेतो. हवेमुळे
आपल्याला ताजेतवाने वाटते. शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे
मिलतो.
माणसाप्रमाणेच इतर सर्व सजीबांना हवेची गरज असते.
बारकाईने निरीक्षण केले तर कुत्र्याची छाती बर-खाली होताना दिसते. त्यारून प्राणी
श्वसन करतात हे आपल्याला कळते.
माहीत
आहे का तुम्हाला ?
० मासे पाण्यात राहतात. मग ते श्वासावाटे हवा
आत कशी घेणार अशी शंका येते; पण मासे पाण्यात विरघळलेस्था हवेचा
वापर करू शकतात.
काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत
मासे पाळतात. पेटीतले मासे श्वासोच्छवास करत असतात. श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा
मासे पाण्यातून घेतात.
त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा
कमी होऊ शकते. हवा संपली तर मासे मरून जातील. म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत
हवा सोडावी लागते.
अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुड़े
येताना दिसतात ते त्यामुळेच.
करून पहा
० एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी ध्या.
० वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा च्या.त्याची वीतभर लांबीची
बारीक सुरळी बनवा.
० या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडवा.
० दुस-या टोकाने पाण्यात फूंकर मारा. तुम्हाला काय आढळून येईल ?
० पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील. यातून काय उलगडते ?
० फुंकरीतून हवा पाण्यात शिरली. ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर
पडली.
आपण काय शिकलो ? …
० हवा सर्वत्र असते.
०हवा डोळ्यांना दिसत नाही.
० हवेला रंग, वास आणि
चव नसते.
सजीवांना श्वासोच्छवासासाढी हवेची गरज असते
है नेहमी लक्षात ठेवा
शुद्ध हवा मिळण्यासाठी दररोज पटांगणात खेळावे.
Comments
Post a Comment