- पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ?
- त्यांनी असे कपडे वापरण्याचे कारण काय ?
- दुसऱ्या चित्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ?
- रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहेत ?
- तुमच्या परिसरात वेगवेगळ्या दिवसांत वापरल्या जाणा-या कपड्यांची यादी करा.
० वेगवेगळ्या दिवसांमध्ये कपड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत?
० कारण त्या
दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झालेले आहेत.
० या बदलांपासून
शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते.
माहित आहे का तुम्हाला.
{GIF}
हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात.
ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३)
हिवाळा
प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा
असतो.
ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला
ऋतुचक्र म्हणतात.
ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
माणसाच्या व इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूंचा मोठा परिणाम होतो.
प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे
कपडे घालतो आणि आहारात बदल करतो. शेती व इतर व्यवसायांवरही ऋतूंचा परिणाम होतो. निसर्गात ऋतूनुसार
अनेक बदल होत असतात. माणसाने या बदलांशी जुळवून
घेणे चांगले.
जरा डोके चालवा
उन्हाळा , पावसाळा, हिवाळा हे ऋतू कोणकोणत्या महिण्यात येतात ?
हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण उबदार कपडे
घालतो. उन्हाळ्यात असे उबदार कपडे घातले, तर काय होईल?
प्राणी कपडे घालत
नाहीत. मग थंडीपासून त्यांचे संरक्षण कसे होते?
हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळतात. या झाडांना पुन्हा पाने कधी येतात?
करून पहा.
आसपासच्या लोकांनी घातलेले कपडे पहा.
त्यांच्या कपड्यातील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. (१) रंग (२)प्रकार (३) व्यवसायानुसार गणवेश.
कपड्यांची विविधता
आपला देश फार मोठा असल्यामुळे लोकांच्या कपड्यात प्रद्रेशांनुसार
विविधता आढळते.
पुरुष शर्ट-पँट शिवाय धोतर-सदरा, पायजमा, तुंगी हे कपडे वापरताना दिसतात. तसेच टोपी, मुंडासे, फेटा, पगडी वापरतात.
pg140
स्त्रिया व मुली साडी,
सलवार-कमीज, फ्रॉक व पँट-शर्ट सुद्धा वापरतात.
सण, उत्सव आणि समारंभात लोक नटूनथटून जातात. काही लोक पारंपरिक पोशाख
घालतात. उठून दिसणारे भरजरी कपडे घालतात.
लोक वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या
प्रकारांचे व वेगवेगळ्या नक्षीचे कपडे घालतात. तुमच्या लक्षात आले असेल. यालाच कपड्यातील विविधता म्हणतात. प्रामुख्याने ऋतूनृसार कोणते कपडे घालायचे ते ठरते, परंतु आवड, सोय व व्यवसाय यावरुही कोणते कपडे घालायचे हे ठरते. तसेच वेगवेगळ्या
परंपरेनुसार सुद्धा कपड्यांमधील विविधता आढळते.
तुम्ही शाळेत जाता तेव्हा गणवेश घालता. सगळ्या विद्याथ्योंनी एकाच प्रकारचा तो गणवेश घातल्यामुळे तुम्ही शाळेत एकसारखे दिसता. तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते. अशाच प्रकारे
काही व्यवसायांमध्ये गणवेश घातले जातात. अशा विविध व्यवसायांची माहिती घ्या.
मी कोण?
१.
पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो.
२.
मी निळे कपडे घालतो,आग लागली कि ती
विझवतो.
३.
खाकी कपडे घालून भी
तुम्हाला नेहमी दिसतो. भांडणतंटे आले, तर मी तिथे पोहचतो.
४.
भी रूग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते.
५. मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो.
pg141
जरा डोके चालवा
१.
कमलला मामाकडे चालत
जायचे आहे पण खूप पाऊस आला आहे. न
भिजता मामाकडे जाण्यासाठी तिला काय करावे लागेल?
२.
जेकबने लोकरीचे
कपडे घातले आहेत परंतु त्याला खुप
गरम होत आहे. त्याने कोणते कपडे घालणे योग्य होईल?
काय करावे बरे
मनजित
आणि मारिया यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे. तिथे वापरण्यासाठी त्यांनी खालीलपैर्की काय-काय सोबत घ्यावे असे तुम्हाला वाटते ? तुम्ही निवडलेल्या
चित्रांखालील चौकटीत अशी खुण करा.
{IMAGE}
pg142
माहीत आहे का तुम्हाला?
सैनिकांचे गणवेश
नैसर्गिक परिस्थितीशी मिलतेजुळते असतात. शत्रूच्या सैन्याला सहज़पणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती केलेली असते. उदा. , वालवंटी प्रदेशात खाकी कपडे,
जंगली प्रदेशात हिरवे, तर हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात पांढरे कपडे वापरतात.
आपण काय शिकलो.
ऋतूमानानुसार कपड्यांमध्ये बदल करावे लागतात.
आवड, व्यवसाय व परंपरेनुसारही कपड्यांमध्ये विविधता आढळते.
Comments
Post a Comment