Skip to main content

४. दिशा आणि नकाशा


वर्गात दोन रांगा करां. मग एकमेकांच्या समोर उभे राहा.
आता पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या समोर असलेल्या मुलीला/मुलाला सांगा. 
१. वर्गाचा फळा तुमच्या कोणत्या बाजूला अाहे? 
२. वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे?
३.शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे ?
तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे निराळी अाहेत ना ? असे का ? समजा, फळा तुमच्या उजव्या बाजूला असेल, तर तो समोरच्या मुलाच्या/मु्लीच्या डावीकडे असेल. समजा, फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल, तर तो समोरच्या मुलाच्या/मुलीच्या पुढच्या बाजूला असेल.
अशाच प्रकारे वर्गाचा मुख्य दरवाजा, शिक्षकांचे टेबल याबाबतची तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे वेगवेगळी येतील. उजवीकडे, डावीकडे, पुढे व मागे अशा उत्तरांवरून एखादी वस्तू नेमकी कोठे, कोणत्या बाजूला आहे ते सांगता येत नाही. म्हणून एखादी वस्तू कोठे अाहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी दिशांचा वापर केला जातो.
पान २०
करून पहा
आता आपण दिशाचा उपयोग करून आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा शोधणार आहोत. शिक्षकांची मदत घेवून वर्गाच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा. आता पुन्हा एकमेकांसमोर उभे राहा. वर्गाचा फळा, मुख्य दरवाजा व शिक्षकांचे टेबल कोणत्या दिशेला आहे ते एकमेकांना सांगा. आता तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे एकसारखी येतील. एखादी वस्तू कोठे आहे किंवा कोणत्या बाजूस अाहे, हे दिशाचा उपयोग करून बरोबर सांगता येते.
। दिशा ओळखायला शिकूया
पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत. क्या कशा ओळखायच्या ? सूर्य ज्या बाजूने उगवतो, ती पूर्व दिशा.सूर्य ज्या बाजूला मावळतो, ती पश्चिम दिशा.
पूर्व व पश्चिम दिशा एकमेकींच्या समोरासमोर असतात.
पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले, तर पश्चिम दिशा आपल्या मागे असते त्याच वेळेस आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते, तर उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते.
तुमच्या परिसरात सूर्योदयाच्या  वेळी ही कृती करून पहा व दिशा समजून घ्या.

चौकटीची गंमत... 
खाली मोठी चौकट दिली अाहे त्या चौकटीत मधोमध तुमचे घर दाखवले आहे. या चौकटीच्या चार बाजूंवर पिवळे पट्टे दिले आहेत. या पट्ट्यांमध्ये दिशा लिहायच्या आहेत.
तुमच्या घराच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवतो ? ती आहे पूर्व दिशा. 
घराच्या ज्या बाजूला सूर्य उगवतो, त्या बाजूच्या पिवळ्या पट्ट्यात 'पूर्व' दिशा लिहा.पूर्व दिशेच्या समोरच्या पट्ट्यात पश्चिम दिशा लिहा. उरलेल्या दोन मोकळ्या पट्ट्यामध्ये उत्तर व दक्षिण दिशा येतील. त्या विचार करून लिहा.
तूमच्या घराजवळ असलेली इतर ठीकाणे खाली दिली आहेत ती ठीकाणे चौकटीत लिहा.
(
१) तुमच्या शेजारची घरे
(
२) तुमच्या घराजवळचे दूकान
(
३) झाड
(
४) जवळचा रस्ता
(
५) जवळचा बसथांबा
आता बघा बरं तुमच्या घराचा परिसर कसा दिसतो ते !

: माहीत आहे का तुम्हाला
सूर्य रोज उगवतो व मावळतो. त्यामुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतला आहे.
२. होकायंत्रामधील चुंबकसूई नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवते. तुम्ही शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने ती पाहू शकता.
काय करावे बरे
सई आणि अभय यांना शाळेत खालील समस्या सोडवण्यास सांगितली आहे. तुम्ही त्यांना मदत कराल का खाली दिलेले क्रोडे सोडवा.
अ. या चित्रात पूर्व दिशा दिली अाहे त्यावरून इतर तीन दिशा पिवळ्या चौकटींमध्ये लिहा. 
आ. आइस्कीमच्या दुकानापासून बसथांब्याकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल ?
इ. अमीरला आइस्कीमच्या दुकानात जायचे आहे त्यासाठी त्याला कोणत्या दिशेला जावे लागेल ? 
ई. साराला बसस्थानकाकड़े जायचे अहे तिला कोणत्या दिशेला जावे लागेल ?
चला खेळूया
गावाची पूर्व दिशा ओळखा. कोणत्या दिशेला काय-काय आहे ते समजून घ्या. त्यानंतर वर्तुळा्त गोल फिरत राहा. आता गटप्रमुखाने सांगितलेल्या दिशेला पटकन तोंड करून उभे रहा. चुकेल तो बाद.
० नकाशामधील दिशांचा वापर
नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात. त्यासाठी नकाशात दिशाचक्र दिलेले असते त्यावरून नकाशातील दिशा समजतात. नकाशा वाचण्यापूर्वी त्यातील दिशा तुमच्या परिसरातील दिशांशी जोडून

घ्यायच्या असतात. उदा. नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी लागते. असे केल्यामुळे नकाशामधील ठीकाणे नेमकी काेणत्या दिशेला अहित हे तुम्हाला लगेच कळेल. पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचतानासुद्धा हीच पद्धत वापरा.
जरा डोके चालवा
१ . उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे रहा. आता तुमचा उजवा कान कोणत्या दिशेकडे असेल? डावा कान कोणत्या दिशेला असेल ? 
२. सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल?
० जिल्हा ,राज्य व देश
'भारत माझा देश आहे' हे प्रतिज्ञेतील वाक्य आपण पहिलीपासून वाचत आलो आहोत. इयत्ता दुसरीमध्ये राज्य, राष्ट्र व जग हे शब्द तुम्ही वाचले आहेत. या पाठ्यपुस्तकात देखील अनेक ठिकाणी पृथ्वी, जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका व गाव हे शब्द आहेत चला तर मग, आपण जिल्हा, राज्य, देश, पृथ्वी व जग यांची तोंडओळख करून घेऊया.
आपण घरात राहतो. आपली घरे जमिनीवर बांधलेली असतात. ही जमीन खूप दूरपर्यंत पसरलेली असते अशा मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणतात. पृथ्वीवर खंडाप्रमाणेच खारट पाणी देखील पसरलेले अाहे. या भागाला महासागर म्हणतात. पृथ्वीला 'जगअसेही म्हणतात. पृथ्वीवरील जमिनीवर अनेक देश आहेत. हे देश अनेक राज्यांचे मिळून तयार झाले आहेत. आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. अशा अनेक राज्यांचा मिळून अापला भारत देश तयार झाला आहे. तुमचा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत देश व जग हे नकाशे सोबत दिलेले अाहेत या नकाशाबद्दलच्या कृती पुर्ण करा.
माहीत आहे का तुम्हाला
नकाशातील सूची : नकाशात द्यायची माहिती
ही चिंह, चित्रे, खुणा, रंगांच्या छटा यांच्या मदतीने
दाखवतात. त्यांची यादी नकाशात दिलेली असते. 
तिला सूची असे म्हणतात. सूची मुळेआपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते.
हे नेहमी लक्षात ठेवा
दिशा ठरवण्यासाठी अापल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला निसर्गातील अनेक घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते.

सोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिला आहे. ० त्यात वेगवेगळे जिल्हे दाखवले आहेत. 
० या नकाशात राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर दाखवल्या अाहेत.

० नकाशात आपला जिल्हा शोधा व रंगवा.
० सूचीत आपल्या जिल्ह्याची चौकट दिली आहे, तीही त्याच रंगाने रंगवा. तुमच्या जिल्ह्याचे नाव सूचीत माझा जिल्ह्याच्या पुढे लिहा
आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांची नावे खालील चौकटीत लिहा.

नकाशाशी मैत्री
०खाली आपल्या देशाचा नकाशा दिला आहे. 
० त्यात आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली ही सुद्धा दाखवली आहे.
आपल्या देशाच्या नकाशा त आपले राज्य शोधा व ते रंगवा.
नकाशाशी मित्री
: ० खाली जगाचा नकाशा दिला आहे.
० त्यात जमीन (खंड) पांढ-या रंगाने दाखवली आहे, पाणी (महासागर) निळ्या रंगाने दाखवले आहे.
० जगातील, जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा, यासाठी हा विशेष नकाशा तयार केला आह:
० जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग रंगवा.
० नकाशाशेजारी दिलेल्या चौकटीत तसाच रंग देउन पुढे भारत असे लिहा. 
'
हा आपला देश आहे'
 
 
 आपण काय शिकलो
मुख्य दिशांची ओळख. 
नकाशातील दिशाचक्राचा उपयोग. 
नकाशांच्या आधारे जिल्हा, राज्य, देश यांची ओळख

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

९. पाणी नक्की येते कोठून

९. पाणी नक्की येते कोठून सांगा पाहू खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत √ अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा.   ( १) तुम्ही प्राणी कशातून पिता ? ( २) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ? ( ३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ? सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे ?   या प्रश्नाचे उत्तर आहे ' पाऊस '. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते. ० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ , ओढे , नद्या तयार झाल्या आहेत. ० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत. ० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते , त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते. ० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते. ० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने ...

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्य...