Skip to main content

15.आपले शरीर



तुमची मित्रमंडळी काय करत आहेत?

शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत?

सांगा पाहू

शरीराचे भाग ओळखा

कपाळ, गाल, नाक आणि कान 
पोट आणि छाती
 दंड मनगट आणि तळहात
०मांडी, गुडघे आणि पाऊल.
शेजारच्या चित्रावरून शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगता येईल का ?

० शरीराची रचना

डोके, धड, हात आणि पाय हे शरीरांचे मुख्य भाग होत. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात.

डोके
डोक्यावर केस असतात. कपाळाखाली दोन डोळे असतात. भुवया आणि पापण्या असतात. दोन बाजूना दोन कान असतात.

समोरच्या बाजूला नाक असते. नाकाखाली तोंड असते. तोंडाखाली हनुवटी असते.

डोके आणि धड यांना जोडणारां शरीराचा आग म्हणजे मान होय. मानेच्या पुढच्या भागास गळा म्हणतात.

pg87

धड
छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. धडाला हात जोडलेला असतो, त्या भागाला खांदा म्हणतात. धडाला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा म्हणतात.

हात

दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पड़तात. अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग.

हाताची बोटे पंजाचा भाग असतात.

दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर.

अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट.

पाय

मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग पडतात. तंगड़ी म्हणजे गुडध्यापासून घोटयापर्यंतचा भाग.
पायाची बोटे पावलाचा भाग असतात.
मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा.
तंगड़ी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा.

pg87
नवा शब्द शिका !
अवयव
ठरावीक कामांसाठी वापरला  कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरले जातात, म्हणून पाय आपले अवयव आहेत.  कान वापरले जातात, म्हणून कान आपले अवयव आहेत.

बाह्यावयव…
शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव. बाह्यवायवांना बाह्यइंद्रिये असेही म्हणतात. कान, नाक, हात, प्राय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्यावयव आहेत.

pg88

सांगा पाहू
  • गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल?
  • कोपर न वाकवता केस कसे विंचराल?
शरीराची हालचाल
विटीदांडूच्या खेळातील दांडू घ्या. तो वाकवायचा प्रयत्न करा. दांडू वाकतो का ?
का वाकत नाही?
समजा, आपले हातपायही वाकले नसते तर ?
आपल्याला हालचाल करता आली असती का ?
आपले काही अवयव वाकतात. त्यामुळे आपण हालचाल करू शकतो.
शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात ?

करून पहा.

आरशासमोर उभे रहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करा.
मान : मान पुढे झुकते, मागे वाकते डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते, उजवीकडे वाकते.
हात : खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हातांची बोटेही वाकू शकतात. त्यामुळे हातांची मूठ मिटते.हातांनी आपण खूप कामे करू शकतो. हाताने तुम्ही लिहिता. वस्तू उचलता, आई लाडू वळते. छोटे बाळ खुळखुळा पकडते.

pg89

कंबर :धड फक्त कमरेपाशी वाकू  शकते. म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते.आपली बरीच कामे सोपी होतात. खाली पडलेली वस्तू उचलता येते .बुटांचे बंद बांधता येतात. खेळताना अडचण येत नाही.

पाय : खुबा, गुडघा आणि घोटा या टिकाणी पाय वाकू शकतो. पायांची बोटेही वाकू शकतात, पण हातांच्या बोटांइतकी वाकत नाहीत.

पायांनीही आपण काही कामे करू शकतो .पायांमुळे आपण उभे रांहतो, चालतो आणि पळतो जिन्यावरून चढतो किंवा उतरतो ,उड्या मारतो. काही यंत्रेही चालवतो.

एक काम अनेक अनेक पद्धती
करून पहा
एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचे नाही असे तुम्ही ठरवलेत .  त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच सांगायचे आहे.
० तुम्हा-ला विचारते , जाऊ की थांबू ?' खुणा करून सांगा - थांबा'
० तुम्हाला विचारले "भाजी कशी झाली आहे?… खुणा करून सांगा  - ‘भाजी मस्त झाली आहे. "
० तुम्हाला सांगितले, 'मांजर आजारी आहे' - खुणा करून विचारा 'त्याला काय झाले आहे ?
० तुम्हाला विचारले 'हवा कशी आहे ?… खुणा करून सांगा -  'थंडी वाजत आहे'

आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो
हा खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरलेत?

काय करावे बरे ?

उंच फळी वरील लाडवांचा डबा काढायचा आहे. हात तर पोचत नाही.
कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळया पद्धतीची निवड करता येते. नेहमीच्या  पद्धतीने काम होत नसेल तर कधी इतरांची मदत घेता येते, कधी विशेष साधने वापरता येतात. एखादे काम करत असताना कोणाला अडचण येऊ शकते. तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी.

जरा डोके चालवा.
ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचे कोणते काम झाले?

माझ्यासारखे दुसरे कोणीही नाही.

ज़गामध्ये खूप खूप लोक आहेत, पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहेत. तरीही एका व्यक्ती सारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही. कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण निरनिराळी असते. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी निरनिराळी असते.

संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसता. हे माहीत होते का तुम्हाला?

माहीत आहे का तुम्हाला?
कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ एक सारखे दिसतात. पण त्यांच्यातही थोडसा फरक असतोच.

आपण काय शिकलो

डोके, ड, हात व पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत. छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. डोके, हात व पाय धडाला जोडलेले असतात.

डोके आणि धड जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. हात खांद्याच्या ठिकाणी तर पाय खुब्यात जोडलेले असतात.
शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते म्हणून आपण हालचाली करू शकतो.
मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होतात.

हे नेहमी लक्षात ठेवा '
सर्व कामे शरीराच्या मदतीने करतो. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी.


Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या