Skip to main content

16.ज्ञानेंद्रिये



सांगा पाहू

ताईचे डोळे बांधलेले आहेत तरी आवाज कशाचा ते तिने कसे ओळखले?

ताईच्या हातात कोणकोणत्या वस्तू आहेत हे डोळे बांधलेले असूनही या मूलाने त्या कशा ओळखल्या?

दोघांचे डोळे बांधलेले आहेत,तरी स्वेटर कोणता आणि बनियन कोणता, हे या दोधांनी कसे ओळखले ?

हे किंवा असे प्रयोग तुम्हीही मोठ्या माणसांच्या परवानगीने करून पहा.

सांगा पाहू

० कैरी कोणत्या रंगाची असते ? आंबा कोणत्या रंगाचा असतो ? हे तुम्हाला कसे कळले
० मिठाची चव कशी असते ? साखरेची चव कशी असते ? तुम्हाला कसे कळले ?

० नवा शब्द शिका !

ज्ञानेंद्रिय … आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये अहित

० आपली पाच ज्ञानेंट्रिये  
कल्पना करा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात. पुढे खड्रडा आहे. तुम्हाला तो दिसतों. तुम्ही खड्रडा टाळून पुढे जाता. खड्डा दिसला नसता तर?
तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात.एकाएकी ढगांचा गडगडाट ऐकू येतो. पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता. राजी ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर?

सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते. त्यामुले हालचाल कणे सोईचे जाते. आपण सुरक्षित राहू शकतो.

सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे मिते ?

ते ज्ञान आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा करून देतात. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात.

सांगा पाहू.
(१)     आकारावरून वस्तू ओळखा.
(२)   चित्रे ओळखा आणि रंग सांगा.

pg94

डोळे : डोळ्यामुळे आपण पाहू शकतो. आपल्याला वस्तूचा रंग समजतो. आकार समज़तो. आकृती कशी आहे याचाही अंदाज येतो.

करून पहा

'’म्हणजे म्हणजे ,वाघाचे पंजे’ – एक नवीन खेळ

वर्गातील सर्व मुलांवर आळीपाळीने राज्य येईल.

ज्याच्यावर राज्य येईल त्यांने फळ्याकडे तोंड करून उभे रहावे. हाताने डोळे घट्ट झाकून घ्यावेत.  शिक्षकानीं इतरांपैकी पाच मुले निवडावीत. त्या पाच मुलापैकी एकेकाने आपल्या जागेवर बसून पुढील वाक्य मोठ्याने म्हणायचे आहे, 'म्हणजे म म्हणजे, वाघाचे पंजे.'

ज्याच्यावर राज्य असेल त्यांने ते नीट ऐकावे आणि आवाज कोणाचा ते ओळखावे उत्तर बरोबर आले तर वर्गातील सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. पाचही वेळा बरोबर उत्तर देतील, त्यांना शिक्षकांनी शाबासकी द्यावी

pg95
कान

: कानामुळे आपण ऐकू शकतो.मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते ते आपल्याला समजते.आवाज कर्कश आहे कि मृदू ते कानामुळेच समजते.

कानामुळे आवाज एखाद्या पक्ष्याचा अहे की प्राण्याचा, तेही कळते. आवाज कोणत्या दिशेने येतो ते आपल्याला कानांमुळेच समजते.

सांगा पाहू : ‘हा आंबा खाऊ नको’, असे आई का सांगत आहे?

नाक : नाकामुळे आपण वास घेऊ शकतो. फुलांचा, सुगंधी उदबत्तीचा वास आपल्याला नाकामुळेच येतो. हवा कुबट आहे हे वासावरूनच समजते कींवा खाद्यपदार्थ खराब झाल्याचेही वासावरून समजते. अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो.

जरा डोके चालवा.

० उन्हाळ्याच्या दिवसांत ज़वळपास कुठेतरी पाऊस पडत असेल तर ते घरबसल्या कसे समजते ?
० आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजले, तर त्याचा फायदा काय ?

काय करावे बरे
घरात कुबट बास येत आहे
खादद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत आहे.

जीभ : जिभेमुळे आपल्याला चव कळते. साखर गोड असते गूळ गोड असतो. कारले कडू असते. या चवी आपल्याला जिभेमुळे समजतात कैरी आणि लिंबू आंबट लागतात. मीठ खारे लागते. हेही आपल्याला जिभेमुळेच कळते.मिरची खाऊन जिभेची आग होते. तोंड भाज़ते. म्हणून मिरची तिखट आहे असे आपण म्हणतो.

pg96

करून पहा :
‘पाच पांडव खोक्यात,नाव घ्या डोक्यात.’ – एक नवीन खेळ.

चार-पाच मित्रमैत्रिणी मिळून हा गमतीचा खे तुम्ही खेळू शकता.

एक पुठ्ठ्याचे खोके घ्या. एका बाजूला भोक पाडा. तुमचा हात जाऊ शकेल एवढे मोठे भोक हवे. ॰ भोकासमोर छोट्या छोट्या पाच वस्तू् ठेवाव्यात. उदा. , खोडरबर, एखादे नाणे, पेन्सिलीचा तुकडा, छोटासा खडा, चिंचोका अशा वस्तू असाव्यात.

ज्याच्यावर राज्य आहे त्या खेळाडूने भोकात हात घालून एक वस्तू हातात घ्यावी. स्पर्श करुन ती ओळखावी, तिचे नाव सांगावे. नंतर ती वस्तू बाहेर काढून, सर्वांना दाखवावी.

त्वचा : त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गार ते कळते. एखादी वस्तू् खरखरीत आहे की गुळगुळीत तेही त्वचेमुळेच कळते.

० हालचालींमधील ताळमेळ

आपण विधिध कामे करत असतो.
प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या हालचाली करतो. त्या करताना आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरतो.
या काकू शेंगदाणे भाज़त आहेत. एकाच वेली त्या कोणकोणते अवयव वापरत आहेत ?
त्यांनी मान खाली वाकवली आहे.डाव्या हातातील चिमट्याने कढई धरली आहे.

pg97

त्या उजव्या हातातील उलथण्याने कढईंतले शेंगदाणे परतत आहेत. डोळ्यांनी कढईकडे पाहात आहेत. शेंगदाणे मीट परतले जात आहेत ना, याकडे त्यांचे लक्ष आहे.

शेंगदाणे खरपूस भाजले गेले, की त्यांचा खमंग वास येतो. तो वास नाकाला जाणवला की त्या गॅसची शेगडी बंद करणार आहेत.

या सगळ्या हालचालींमध्ये ताळमेळ नको का? ताळमेळ नसेल, तर चुका होऊ शकतात शेंगदाणे परतताना सांडतील. नीट भाजले जाणार नाहीत. कच्चे तरी राहतील किंवा करपतील.

कोणतेही काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ नसेल, तर कामांत चुका किंवा घोटाळे होऊ शकतात.

जरा डोके चालवा

० शिलाई मशीनवर कपडा शिवताना हालचालींतील ताळमेळ कसा साधला जातो?

० ज्ञानेंद्रियांच्या उणिवांवर मात

शरीराचा एखादा अवयव मीट काम करू शकत नसेल , तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी येतात. डोळे व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट दिसत नाहीं कान व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट ऐकू येत नाहीं

असे असेल तर हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत. आपली कामे स्वत: करणे अवघड जाते,पण अशा अडचणीवर मात करता येते. काही दोष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर नाहीसे होतात. काही बाबतींत लोकांची मदत रोता येते. अनेक प्रसंगी विशेष साधनांची मदत घेता येते. मग स्वतःची कामे स्वतंत्रपणे करता येतात.

pg98

नीट दिसत नसेल तर चश्मा वापरता येतो. अजिबात दिसत नसेल, तर आवाज ऐकून, हतांनी चाचपून, आपली कामे करता येतात. अंध व्यवतींना पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिले असेल. काठीच्या मदतीने ते समोरील वाटेचा अंदाज घेतात. आसपासच्या आवाजांचाही रस्ता ओळखण्यास मदत होते. भर रहदारीच्या रस्त्यारूनही ते स्वतंत्रपणे चालू शकतात.

ऐकू.येत नसेल, तर श्रवणयंत्र वापरता येते.
अजिबातच ऐकू येत नसेल, तर खाणाखुणांची भाषा वापरता येते.
काही वेळा कानाची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ लागते.

पायात दोष असेल तर ?
खास बनवलेली वाहने वापरता येतात. अडून रहावे लागत नाही.

माहीत आहे का तुम्हाला

अरुणिमा सिन्हा बावीस वर्षाची, उत्तर प्रदेशात राहणारी मुलगी. एकदा रेल्वेगाडीतून प्रवास करताना तिची चोरांशी झटापट झाली. या झटापटीत ती डब्यातुन बाहेर फेकली गेली. शेजारच्या रुळावरून दुसरी गाडी धावत होती. अरुणिमा त्या गाडीखाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली.

डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला, परंतु त्यांना अरुणिमाचा एक पाय कापावा लागला. अरुणिमाला अनेक लोक भेटायला यायचे. प्रत्येकाला वाटायचे हिचे पुढे कसे होणार ? पण तिने ठरवले, कीं बिलकूल हताश व्हायचे नाही. कोणीही आपल्याला लाचार म्हणू शकणार नाही, असे काहीतरी करून दाखवायचे.

डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला. नवीन पायाची सवय होताच तिने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अपधातानंतर अवघ्या वर्षातच तिने हिमालयातील एक उंच शिखर सर केले.

पाठोपाठ सलग पुढच्या वर्षीही एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर केले. अरुणिमाच्या या गोष्टीवरून काय शिकायला मिलते ?

आपण काय शिकलो

ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समज़ते. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.

डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो, कानांमुळे ऐकू शकतो. नाकामुळे श्वास घेऊ शकतो. जिभेमुळे आपल्याला चव कळते त्वचेमुळे स्पर्श कळतो.

काम करताना हालचाली ताळमेळ असावा लागतो. ताळमेळ नसेल तर चुका होतात.
एखाद्या अवयवात उणीव असेल तर कामे करण्यात अडथळे येऊ शकतात.
अडचणींमुळे घाबरून जाऊ नये कारण त्यावर मात करता येते.
नेहमी लक्षात ठेवा

एखाद्या अवयवात दोष असला तरी त्यातून मार्ग काढता येतो. स्वतंत्रपणे जगता येते.


Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह