सांगा पाहू
० चित्रात पु-या
तयार करताना दाखवले आहे. पु-या तयार करण्यासाठी त्या तळताना त्यासाठी लाकडे जाळून
उष्णता दिली जात आहे.
खाली दिलेली चित्रे
बघुन अशीच माहिती सांगा
सांगा पाहू
काही अन्नपदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते?
- आपण कोणते अन्न पदार्थ न शिजवता खातो?
- स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गँस वापरणे का सोयीचे जाते?
० अन्नपदार्थ कसे
बनबतात ?
लोक आपल्या
आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा
वस्तू आणतात. भाजीपाला फळे आणतात. अंडी, मांस, मासे आणतात. ल्यांच्यापासून ते
आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात.बरेचसे अन्मपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी
लागते. भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात. पु-या, भजी असे पदार्थ तळून
करतात. त्यासाठी तेल किवा तूप वापरतात. मोदक, इडली असे पदार्थ वाफवून करतात.
पोळी, भाकरी हे
पदार्थ भाजून करतात. अन्नपदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात, ते अधिक
खमंग आणि रुचकर होतात.
pg82
सगळेच अन्नपदार्थ
उष्णता देऊन खात नाहीत. काही पदार्थ आपण कच्चे खातो.फळे नेहमीच कच्ची, म्हणजे न
शिज़वता बटाटा कधीकधी टोमटो, काकडी अशा काही भाज्याही आपण कच्च्या खातों. काकडीची
क्रोशिंबीर, केळीचे शिकरण हे अन्नपदार्थ उष्णता न देताच करतात.
चवीतील फरक अनुभवा
गंमत आहे ना
१. पापड भाजूनही
खातात.तळूनही खातात.
एकाच प्रकारचे दोन
पापड ध्या. एक भाजून ध्या. दुसरा तळून ध्या. दोघांच्या चवींत काय फरक पडतो ते पहा.
तुम्हाला कोणता जास्त आवडला ?
२. दाणे भाजून
खातात व कच्चेही खातात त्यामुळे दोन्होंच्या चवीत काय फरक
पडतो ? तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात ?
कच्च्या बटाट्याची
फोड व उकडलेल्या बटाट्याची फोड यांच्या चवीतील फरक क्रोणता ?
० उष्णता देण्याच्या
निरनिराळया पद्धती
अन्नपदार्थ तयार
करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात.
pg83
० नवा शब्द शिका !
ज्वलनशील पदार्थ :
जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाना ज्वलनशील पदार्थ म्हणतात. कापूर ज़ळू शकतो,
म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. पाणी जळू शकत नाही, म्हणून पाणी ज्वलनशील
पदार्थ नाही.
इंधन : उष्णता
मिळण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोईस्करपणे वापरता येतो, त्याला इंधन म्हणतात.
स्वयंपाकाचा गॅस,रॉकेल,दगडी कोळसा ही इंधनाची उदाहरणे आहेत . सर्वच ज्वलनशील
पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत. जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर
उष्णता देतात, त्यांनाच इंधन म्हणतात.
आजकाल अनेकजण
स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात. हे इंधन वापरायला सोयीचे असते. गॅस पटकन
पेटतो. त्याचा धूर होत नाही. गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो.
काही लोकांकडे चूली
असतात. चुलींमध्ये लाकडाचे सरपण चापरतात. लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते. शिवाय
लाकडांचा धुरपण होतो.
सरपण मिलावण्यासाठी
झाडे तोडावी लागतात. त्यामुळे परिसराची हानी होते. काहीजण कोळशाची शेगडी वापरतात.
कोळशापासूनही धूर होतो.
ज्यांच्याकडे
लाकूड, कोळशासारखी धूर करणारी इंधने वापरतात, त्यांनी स्वयंपाक घराला खिंडक्या
ठेवाव्यात. त्यामुळे उजेडही भरपूर मिलतो आणि धूर साचत नाही.
pg84
काहीजण इंधन म्हणून
रॉकेलवर स्वयंपाक करतात. त्यासाठी स्टोव्ह वापरतात.
रॉकेलेला घासलेटही
म्हणतात. बाजारात खाता विधिध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात. त्या वापरणे खूप
सोईस्कर असते. काहीजण बायोगॅस वापरतात. सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ
शिजवणा-या सौरचुली
वापरणारेही काहीजण आहेत.
आपण काय शिकलो .
- अन्नपदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात. त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होतात.
- उकळणे, वाफवणे, तळंणे, भाजणे या उष्णता देण्याच्या विधिध पद्धती आहेत.
- कोशिंबीर,शिकरण हे काही पदार्थ उष्णता न देता तयार करतात.
- इंधन वापरणे व त्या आचेवर स्वयंपाक करणे सोईंचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात.
- वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यांसाठी उष्णता मिळवता येते.
हे नेहमी लक्षात
ठेवा
लाकूड आणि लोणारी
कोळसा इंधन म्हणून वापरल्यास परिसरातील झाडांची हानी
होते.
Comments
Post a Comment