काळाचे तीन भाग आहेत. जो घडून गेला जो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमानकाळ आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ. आज
सोमवार आहे. "आज" हा शब्द वर्तमानकाळ दाखवित. उद्या माझा वाढदिवस आहे. 'उद्या' "हा शब्द भविष्यकाळ दाखवितो.काल
आजीने मला गोष्ट सांगितली. ‘काल' हा शब्द भूतकाळ दाखवितो. काळ
समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कलेंडर, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा
उपयोग होतो.
- दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो?
- दिनदर्शिकेचे पान तुम्ही केंव्हा आणि का बदलता?
- दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात ?
माहीत आहे का तुम्हाला
इतिहास विषयाचा अभ्यास करताना ‘काळ’ समजून घेणे गरजेचे असते.
एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदातात्ना कांही वेळेस जुन्या मूर्ती , नाणी,
खापराचे तुकडे इत्यादी वस्तू सापडतात.या वस्तू कोणत्या काळातील आहेत त्याचा अभ्यास
केला जातो.अशा अभ्यासातून त्या वस्तूचा काळ समजतो.
जरा डोके चालवा.
आजचे वर्तमानपत्र दुस-या दिवशी जुने होते परंतु एखादी गोष्ट आठवली
नाही तर आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्रे शोधून त्यातून पाहीजे असलेली माहीती मिळवतो.
म्हणजेच आज चे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्वाचे साधन बनणार असते.
pg30
सांगा पाहू
'काळ' मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा
अभ्यास करावा लागतो ?
काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन करताना सेकंद-मिनीट-तास, दिवस-रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे करतो. असा काळ
आपणांस मोजता येतो. घटिकापात्र, घड्याळ, दिनदर्शिका ही काल मोजण्याची साधने आहेत.
माहीत आहे का तुम्हाला ?
चौदाव्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला.
यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काचेची दोन भांडी असत. त्या भांड्यांना
एका भांड्यातील वाळू दुस-या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्रे असत. एका भांड्यात बारीक
कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्रावाटे ती सर्व वाळू एक तासात खालच्या
भांड्यात पडेल, अशी रचना
केलेली असे. सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्याबरोवर लगेच घड्याळ उलटे केले जात
असे. अशा त-हेने एक तासाचा कालखंड मोजण्यात येत असे. ही घड्याळे भारतातही वापरात
होती. https://www.youtube.com/watch?v=TUnsp-YTOM4
करून पहा
भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील छायाचित्र खाली दिलेल्या चौकटीत
चिटकवा. भविष्यकाळाच्या चौकटीत तुम्ही २० वर्षानंतर कसे असाल, याचे कल्पनाचित्र काढा.
सांगा पाहू
आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो ? व्यवहाराच्या सोईंसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो. उदा. , आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या या शब्दांचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळ मोजत असतो.
आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो ? व्यवहाराच्या सोईंसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो. उदा. , आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या या शब्दांचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळ मोजत असतो.
आपण काय शिकलो
व्यवहाराच्या सोईंसाठी आपण काळाचे भाग पाडतो. आता, थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर, असे शब्द वापरताना आपण नकळत काळ
मोजत असतो.
काळ समजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी
साधनांचा उपयोग होतो.
काळाचे विभाजन करताना सेकंद-मिनिट-तास, दिवस-रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष असे भाग करतात.
जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील
ऐतिहासिक वास्तु-मुळे काळाची समज येते. गावाचा/परिसराचा इतिहास समजण्यास मदत होते
Comments
Post a Comment