Skip to main content

२६ . तिसरीतून चौथीत जाताना



सांगा पाहू
तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे?

काळाची समज या पाठात तुम्ही वीस वर्षानंतर कसे दिसाल, याचे एक चित्र काढले होते. ते काल्पनिक होते. कारण तेव्हा तुम्ही खरेच कसे दिसाल हे तर कुणालाच ठाऊक नाहीं पण मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे? तुम्हाला काय करून दाखवायचे आहे ? हे मात्र तुम्ही स्वत: ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकले पाहिजे. मेहनत घेतली पाहिजे.
     शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढेच नाही. आपण शाळेत तर शिकतोच. पण आपण घरच्या व्यक्ति माणसाकडूनही शिकतो. तसेच आपल्याला परिसरातूनही शिकता येते. म्हणून तर आपण परिसराचा अभ्यास करतो.

परिसराची काळजी

अपना परिसर आपल्या एकट्याचा नाही. तो इतरांचाही आहे. परिसराकडून सर्वाच्या गरजा भागवल्या जातात. म्हणून परिसराची काजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आधी आपण स्वत:चे, आपल्या घराची आणि शाळेची काजी घेतली पाहिजे. मग परिसर आपोआप सुंदर बनेल.
      परिसरातून ज्या गोष्टी मितात. त्यांचा आपण ज़पून वापर केला पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी यांची आपण कधीच नासाडी करू नये.
जरा डोके चालवा
सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर काय होईल ?
आपण घरातला केरकचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल ?
ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर आपण आपले नाव का कोरु नये ?
प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आपण इकडे तिकडे का फेकू नयेत ?

सांगा पाहू

० तुमच्या परिसरात तुम्हाला काय आवडते आणि का ?

आपले घर

पक्षी घरटी कशी बांधतात, हे तुम्ही पहिले आहे का ? त्यांच्या पिलांसाठी त्यांना कितीतरी श्रम घ्यावे लागतात. तुमच्या घरातील लोक तुमच्यासाठी श्रम करतात. तुम्हीपण त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे.

आई, बाबा, घरातील इतर माणसे यांचे काम हलके करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त घरच्याच नाही, तर सगळ्यास्त्रियांचा आपण आदर केला पाहिजे.

जरा डोके चालवा.
Ø  तुम्ही चांगले वागावे असे आई,बाबा का सांगतात ?
Ø  आई , बाबा नित जेवले कि नाही, हे तुम्ही कधी पाहता का?
Ø  तुम्ही घरातील मोठ्या माणसांची मदत कशी करू शकाल?
Ø  घरात कोणी आजारी पडले, तर तुम्ही काय करता?


आठवा पाहू
एकमेकांवर अवलंबून असणे म्हणजे काय ?

परिसरातील घटक

वनस्पती आणि प्राणी हे सर्व परिसराचे घटक आहेत. आपणसुद्धा परिसराचा एक भाग आहोत. परिसरातील सगळ्यांचे जीवन आनंदी तसेच सुरळीत चालले पाहिजे. सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. आपण काय करतो, कसे वागतो, याचा परिसरार परिणाम होतो.

करून पहा.
  1. तुमच्या बोटांना शाई लावून त्यांचे कागदावर ठसे घ्या. तुमचे आणि इतर मुलांचे ठसे वेगळे दिसले का?
  2. एकाच झाडाची दोन पाने बघा, त्यांत काय फरक दिसतो ?


एकमेकांशी वागणे

एकाच झाडाची सगळीच पाने सारखी नसतात. काही लहान तर काही मोठी असतात. काहींचा रंग किंचित निराळा असतो. सगळी फुले एकसारखी नसतात. माणसांचेही तसेच आहे. आपला चेहरा निराळा असतो. आपल्या बोटांचे ठसे तर जगात दुस-या कोणत्याही व्यक्तीचे असू शकत नाहीत.
प्रत्येक माणसात काही ना काहीतरी विशेष असते. आपण दुस-या कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखू नये.
तुम्ही पाहिले असेल की, काही झाडे उंच आणि मजबूत असतात. पण काही वेळी लहान आणि नाजूक असतात. मोठी झाडे त्यांना आधार देतात. आपणही एकमेकांना असाच आधार दिला पाहिजे.

152 pg

माहीत आहे का तुम्हाला ?
भारताला १५ आँगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्य

दरवर्षी १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. आपल्या देशात स्वातंत्र्यहे. याचा आपण अभिमान बागला पाहिजे. आपल्याला विचार करायचे स्वातंत्र्य आहे. मोठेपणी आपण काय शिकायचे हे आपण ठरवू शकतो. आपला व्यवसाय आपण निवडू शकतो. आपल्या देशात सर्व नागरिकांना समान हक्क आहेत.
   स्वातंत्र्य म्हणजे आपण वाटेल तसे वागावे असे नाही. निसर्गाकडे पहा. निसर्गात सगळे नियमानुसार घडते. मुंग्या व्यवस्थित रांगेत चालत असताना दिसतात. मधमाश्या सारख्या काम कत असतात.
   आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे. त्यासाठी आपल्यात प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, शिस्त असली पाहिजे. लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मोठेपणी कामी येतात.
  परिसराचा अभ्यास करून आपल्याला खूप शिकायला मिते. इयत्ता चौथीत तुम्ही आणखी काही गोष्टी शिकणार आहात.

रा डोके चालवा
गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहून काम करण्याचे कोणते फायदे असतात ?
 ***

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या