सांगा पाहू
० या चित्रातील
मुलाच्या आईचा वेश कोणता आहे?
० ताईचा वेश कोणता आहे?
० आजोबांच्या अंगात
कोणत्या रंगाचा शर्ट आहे?
० बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे?
{IMAGE}
० आई कोणती आणि ताई कोणती, हे तुम्ही कसे ओळखलेत?
० आजोबा कोणते आणि
बाबा कोणते, हे तुम्ही कसे ओळखलेत ?
सांगा पाहू
मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती मिळवा?
० तान्हे बाळ मान कधी धरू लागते
?
० छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते?
० छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात करतात?
० छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात?
० अगदी तान्ह्या बाळांना भात का भरवत नाहीत?
० तान्ह्या बाळांना कडेवर का घ्यावे लागते?
pg 134
बाळाची वाढ
घरात इवलेसे बाळ जन्माला येते. घरादाराला आनंद होतो. आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काळजी घेते. बाळाला रोज अंघोळ घालते. भूक लागली के दूध पाजते.अंगाई गीत म्हणून
झोपवते.बाळ हळूहळू वाढत असते. त्याची उंची वाढते. वजनही वाढते.
बाळ मोठे होऊ लागते तसे ते रांगू लागते. बाळाला
एक-एक करून दात येऊ लागतात. बाळ उभे
राहायला शिकते. नंतर ते पावले टाकू लागते. अशी प्रगती होत असताना त्याची
उंची आणि वजन वाढतच असते.
बाळ आधी आईला ओळखायला शिकते. मग ते घरातील इतरांना ओळखू लागते. दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागते. आई दूधभात भरवू लागते.हळूहळू ते
बोलायला शिकते. मुलगा असो वा मुलगी,वाढ होताना निसर्ग दोघामंध्ये काहीही भेदभाव करत नाही. आणखी मोठे झाले की, ते बाळ राहात नाही. छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो. छोट्या मुलीची मोठी मुलगी होते.
सहाव्या वर्षी मुले
शाळेत जाऊ लागतात. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मुलांमुलींची उंची वाढत असते. साधारणपणे वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहाते. उंची वाढत नसली तरी वजन वाढत असते चांगल्या सवयी, चांगला आहार यांच्यामुळे
प्रकृती उत्तम राहायला मदत मिळते. नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा
होतो.
चाळीशीनंतरही वयानुसार शरीरात
बदल होत राहतात. हळूहळू डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते.केस पांढरे होऊ लागतात.
म्हातारपणी शरीराची ताकत आणखी कमी होऊ लागते. कानानी
नीट ऐकू येईंनासे होते. स्मरणशक्ति कमी होते. दात पडू लागतात. झोप कमी होते. निरनिराळे आजार होऊ शकतात.
एके दिवशी मृत्यु येतो.
pg135
माहित आहे का तुम्हाला?
० बाळ मोठे झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात.
ते होऊ नयेत, म्हणून लसी देतात.
० कोणती लस कधी द्यायची ते ठरलेले असते प्रत्येक बालकाला लसी देणे गरजेचे आहे.
सांगा पाहू
एकाच आंब्याच्या
झाडाची ही तीन चित्रे आहेत.सगळ्यात पूवींचे चित्र
कोणते असेल? सगळ्यात अलीकडचे चित्र कोणते असेल ?
मधल्या काळातील चित्र कोणते असेल ? हे तुम्ही कसे ओळखले ?
नवा शब्द शिका
बीजांकुरण : वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो. त्याला अंकुर म्हणतात. म्हणुन कोंब फुटण्याला बिजांकुरण असे म्हणतात.
० वनस्यर्तीची वाढ
काळानुसार जसे माणसांत बदल होतात, तसे ते वनस्पतींमध्येही होत असतात. बीजांकुरण आले की नवी वनस्पती
निर्माण होते. तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो. मगच अंकुरापासून तयार झालेले रोप जोम
धरते मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात पानांमध्ये अन्न तयार होऊ लागते. वनस्पती वाढू लागते. मग वनस्पतीला नवीन नवीन पाने फुटतात.वनस्पतीची
उंचीही वाढू लागते.
योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात. फुलांपासून फळे तयार होतात. या बिया असतात. त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात.
झाडांना सतत उन,
वारा, पाऊस यांना तोंड द्यावे लागते. कधी कधी खोडावर
कीड पडून ती वाढू लागते.त्यामुळे झाड आणखी दुबळे
होते.शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटते.
झाड खाली पडते. झाडाचा शेवट होतो.
सर्वच वनस्पतींचा शेवट होतो. पण त्याची कारणे वेगळी
वेगळी असतात.
आपण काय शिकलो
- बाळाच्या वाढीचे व प्रगतीचे काही ठरावीक टप्पे असतात.
- वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते
- वयाच्या चाळीशीनंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते.
- माणसाप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होतात.
- मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते. बीजांकुरणापासून वनस्पर्तीच्या वाढीचे विविध टप्पे असतात. वनस्पतीचीही उंची व ताकद वाढते.
- माणूस असो किंवा वनस्पती, त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो.
नेहमी लक्षात ठेवा
प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्वाचे आहेत.
Comments
Post a Comment