गाव कसे तयार होते ?
खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून 'गाव' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली
. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे, त्याची दुरुस्ती करणे,कापड विणणे, दागिने बनवणे,मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले.
शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात?
शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा.
कृषी प्रदर्शनाला भेट द्या.
सांगा पाहू
तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?
गावात मंदिर, https://www.tourmyindia.com/blog/wp-content/uploads/2013/12/Brihadeeswara-Temple.jpg लेणी,मशीदhttp://www.beautifulmosque.com/PostImages/Jama-Masjid-Delhi-india-1.jpg ,चर्च, http://penguin.unitingchurch.org.au/wp-content/uploads/2011/11/PB280119.jpg स्मारक, https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/f3/Gandhi_Memorial.jpg/1280px-Gandhi_Memorial.jpg किल्ला, http://www.omtourism.in/photos/maharashtra_fort_pratapgad.jpg वस्तुसंग्रहालय http://www.tourismguideindia.com/images/Maharashtra/Satara/Shri%20Bhavani%20Museum,%20Aundh.jpg इत्यादी वास्तू असतात.या वास्तूवरून गावाची ओळख निर्माण होत असते.ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला' आपल्या गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडते. आपल्याला गावाचा इतिहास समज़ण्यास मदत होते. या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे.तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे. हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे. गावाचा उरूस, जत्रा, http://2.bp.blogspot.com/-l72qpyIRSFc/UIPMhvdZT6I/AAAAAAAADz8/Ruy8d5ZPenE/s1600/fiars+in+aurangabad.jpg एखादे ' धार्मिक स्थळ किल्ला यांमुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. उदा-, रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. https://www.youtube.com/watch?v=jQ13dgPTs6E
करून पहा.
( १ ) तुमच्या गावाचे नाव कसे पडले, याची माहिती पालकांना किंवा शिक्षकाना विचारा.
( २) व्यक्ती, फळ, फूल, जड, प्राणी, पक्षी, पाणी यांच्या नावाशी निगडीत असणा-या गावाची नावे शोधा व लिहून काढा. प्रत्येक गावाला नाव असते.तसेच रस्ता, चौक, पेठ यांनाही नावे असतात. ही नावे कशी पडली याचा शोध घ्या.
माहीत आहे का तुम्हाला
छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येेत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव (दिंडोरी) या गावाज़वळ थांबले. तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. त्यामुळे या गावाला'तळेगाव' हे नाव पडले.
अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गाघाच्या ' परिसरात पूर्वी 'धामण' या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला 'धामणगाव' असे नाव पडले.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात "आष्टी-धोतरजोड्याची' नावाचे गाव आहे. तेथे पूर्वी उत्तम व तलम धोतरजोड्या तयार होत असत.त्यापुले त्या गावाला
आष्टी-धोतरजोड्याची' म्हणून ओळखले जाते.
शिवराम हरी राजगूरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतीकारक होते. https://www.youtube.com/watch?v=Y6gGczScnOk
भगतसिंग राजगूरू, सुखदेव हे तीनही क्रांतीकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात 'खेड' या गावी राजगूरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्शणानंतर ते अमरावतीस गेले तेथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली . क्याच्या १ ५ व्या क्यों वयाच्या १५ व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले.त्यांना मराठी संस्कृत हिंदी उर्दु इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती.पूढे राजगूरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेड या जन्मगाबास 'राजगुरूनगर' असे नाव देण्यात आले आहे. https://www.youtube.com/watch?v=9oQbThgnsuI
करून पहा
जागतिक वारसा दिन : १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो.या दिवंशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या. त्यांचे महत्त्व जाणून घ्या., ' जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणते नियम अाहेत? ते नियम संकलित करा.
अपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू इमारती, जुने वाडे यांची चित्रे काढा ती खालील चौकटीत चिकटवा.
गावाला किंवा जुन्या वास्तु याच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो तसाच तो गावातील माणसांच्या मुळे व त्यांच्या महंत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळंतो. अापल्या परिसरातील सैनिक, लेखक, कलावंत इत्यादीची माहिती गोळा करा त्यांना शाळेत निमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या.
माहीत आहे का तुम्हाला.
संत गाडगे महाराजांचे मूळ नांव डेबूजी झिंगराजी जानोरकर होय त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव (शेणगाव) आहे. संत गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली.कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि स्वत: च उत्तर देत. अापली माणसं गरीब का राहिली?तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून. तेव्हा ते लोकांना 'शिका' असे आवाहन करत असत. त्यांना विसाव्या शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जनसेवेच्चा कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे. https://www.youtube.com/watch?v=aDZO3O2vF_c
गावच्या आठवडा बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेटा.. पुढील प्रश्नांच्या आधारे त्याची मुलाखत घ्या.
(१) तुम्ही किती वर्षे हा व्यवसाय करत आहात?
( २) तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू विक्रीला असतात?
(३) तुम्ही वस्तू कोठून आणता?
(४) वस्तूंच्या वाहतुकींसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो?
दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक अाठवडे बाजारावर अवलंबून असतात. या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. यात प्रामुख्याने अन्नधान्य भाजीपाला शेतीची अवजारे कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध होतात. बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात. त्यांना त्यांची खुशाली समजते.
जेजुरी गाढवाचा बाजार https://www.youtube.com/watch?v=-ISC13tTacI
बाजाराचे अनेक प्रकार आहेत.उदा.फुलांचा बाजार,फळांचा बाजार त्याचप्रमाणे गाढव,घोडे इत्यादी प्राण्यांच्याही खरेदी-विक्रीचे बाजार भरतात. पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील रूढी हि ठिकाणे गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत.तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो.अशा बाबिन्मुलेही गावाची ओळख होते.
काय करावे बरे ?
आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या दोन चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का?
करून पहा.
शेजारील चौकटीत व्यक्तीचे नाव, गावाचे नाव , नातेसंबंध , प्राण्यांचे नाव , भाजीचे नाव दडलेले आहे, ते शोधा.
Thanks for share such great informative post about Rajasthan Tour Packages actully real india and very helpful for tourist who are planning to visits India.
ReplyDelete