Skip to main content

१८. माझे कुटुंब आणि घर



करून पहा
कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आई वडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्याकुटुंबाविषयी माहिती लिहा.
·         कुटुंबात आई, वडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो.
·         याशिवाय काही कुटुंबात आजी-आजोबाहि असतात.
·         कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते.
आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो. आई-वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात.आपली काळजी घेतात.कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते.आपली अन्न वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते.कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात.कुतुम्बातील व्यक्तीमध्ये जिव्हाळा आसतो. प्रेम आपुलकी मुले आपल्याला कुटुंबात राहायला आवडते अडीअडचणीच्या काळात सार्वजन एकमेकांना मदत करतात. आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात.आजारपणात आपले आई-वडील आपली देखभाल करतात.

छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब
काही कुटुंबामध्ये आई-वडील व त्यांची एक किंवा दोन मुले एवढीच माणसे असतात.अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात.काही कुटुंबात आजी-आजोबा,काका-काकू, सख्खी व चुलत भावंडे राहतात.अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात.

विस्तारित कुटुंब
आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले आसतात.काका,काकू,मामा,मामी,आत्या,मावशी आपल्या नात्यागोत्याची असतात.अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात.नातेवैकामुळे आपले कुटुंब विस्तारते.
विस्तारित कुटुंबातील सार्वजन एका घरात राहत नाहीत, पण त्यांच्यात प्रेम जिव्हाळा असतो.वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात.
·         तुमच्या विस्तारित कुटुंबात कोणकोण आहे?
·         तुमचे त्यांच्याशी कोणते नाते आहे?
·         तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात?

करून पहा.
कुटुंबवृक्ष:
तिसऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोतोंचा अल्बम पाहत होती.वाढदिवस,लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे , तर काही चेहरे अनोळखी वाटले.काही फोतोंमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले.रेहानाने आईला विचारले,कि हे सगळे लोक कोण कोण आहेत?आई म्हणाली, हे सगळे आपले नातेवाईक आहेत.या फोटो मध्ये काका-काकू,मामा-मामी,दोन्हीकडचे आजी-आजोबा आहेत.रेहाना आईला म्हणाली-मला सगळे नित समजावून सांग.आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले.

चित्र : रेहानाचा कुटुंब्वृक्ष
काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात.अशा पिढ्यांची वंशावळ तयार होते.* तुम्ही आई-वडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा.

कुटुंब संस्थेतील बदल :
काळाप्रमाणे कुटुंबसंस्था बदलत जाते.एकेकाळी आजी आजोबा ,आई-वडील,काका-काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे कुटुंब असे.त्याला एकत्र कुटुंब म्हणत.हि सर्व मानसे एकत्र राहत.नोकरी,उद्योग –व्यवसायाच्या निमित्तने हि एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली, कि त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात.अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात.अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे.

कुटुंबातील आपली कामे.

करून पहा.
·         आपल्या घरातील कामांची यादी तयार करा.
·         तुमच्या घरात हि कामे कोण करते?
·         यांतील कोणती कामे तुम्हाला आवडते?
·         तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का?
पाण्याची साठवण,स्वयंपाक करणे व स्वच्छता हि घरात रोज करावी लागणारी कामे आहेत.घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात.पाहुणे येतात.त्यांचे आगत-स्वागत करावे लागते.वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते.घरात अशी खूप कामे असतात.ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत.कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही.घरातील प्रत्येक छोटे-मोठे काम महत्त्वाचे असते.हि कामे प्रेमाने व अप्ळूलाकीने सार्वजन करतात.त्याची आपल्याला जाण असावी.
घराची स्वच्छता व सजावट :
करून पहा.
घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीट नेटके पणासाठी कोणती कामे करावी लागतात, याची यादी तयार करा.
·         वरील दोन चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो, ते वहीत लिहा.
आपले घर स्वच्छ व नीट नेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते.घरात सगळीकडे पसारा असला , तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाहीत.घरात स्वच्छता राखणे हि कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे.घरातील केरकचरा इकडे तिकडे फेकू नये.तो काचारापेतीतच टाकावा.कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये.म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होईल.
हे नेहमी लक्षात ठेवा.
घरातील ओळ व सुका कचरा वेगळा करा.तो दोन वेगवेगळ्या टोपल्या मध्ये टाका.ओल्या कच-या मधून खात तयार करता येते.सुक्या कच-या मधून कागद , काच,पत्रा वेगळा करता येतो,त्याचा पुन्हा वापर करता येतो.
माहित आहे का तुम्हाला?
मोबाइल ,सीडी,डीव्हीडी,पेन ड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड वाढला आहे.या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या, कि निरुपयोगी होतात.अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो,त्याला ई-कचरा म्हणतात.ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे हि एक मोठी समस्या आहे.

करून पहा.
घराची सजावट करा.
·         घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवा.
·         जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही,त्या सजावटीसाठी मोठ्यांची मदत घ्या.
·         सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले?
खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये , त्याखाली X अशी खून करा. ते का वापरू नये ते सांगा.
सांगा पाहू:
सण – उत्सव
·         आपण सण-उत्सव का साजरे करतो?
·         आपले सण-उत्सव कोणत्या बाबींशी संबधित आहेत?
आपण कुटुंबात अनेक सण-उत्सव साजरे करतो.कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात उत्सव साजरे केले जातात.शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे.आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबधित आहेत.होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे.पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास “वैशाखी” हा उत्सव साजरा केला जातो.महाराष्ट्रात पेरणीनंतर “बैलपोळा” हा सन साजरा करतात.तामिळनाडू मध्ये ‘ओंगळ’, तर केरळमध्ये ‘ओणम’ हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात.दसरा,दिवाळी,गुढीपाडवा यांसारखे सन पिके हातांत आल्यानंतर साजरे केले जातात.
  पर्युषण पर्व ,बुद्धपौर्णिमा,रमजान ईद,नाताळ,पतेती हे महत्वाचे सन आहेत. सण-उत्सव कोणतेही असोत,सआर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात.एकमेकांना शुभेच्छा देतात.
  ‘स्वातंत्र्यदिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.सर्व नागरिक ते साजरे करतात.१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारताला ब्रिटिशा पासून स्वातंत्र्य मिळाले,म्हणून तो दिवस आपण ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून साजरा करतो.भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु करण्यात आली.म्हणून हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.
   उत्सवामुळे लोक एकत्र येतात.त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते.उत्सवात गाणी,नृत्ये ,रांगोळ्या ,खेळ,स्पर्धा,शर्यती यांची रेलचेल आसते त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. सण-उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तीना व लहान मुलांना त्रास होतो.मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते.
माहित आहे का तुम्हाला?
महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत.ठाणे जिल्ह्यात ‘वारली’ हि आदिवासी जमात आढळते.ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे ‘कोळी भाजी’ (कोवळी भाजी) नावाचा एक कौटुंबिक सन साजरा केला जातो.कोळी हि एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसाराखा वापर होतो.पाउस सुरु झाल्यानंतर हि वनस्पती उगवते.कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी,कोवळी असलेली कोळी जमा करून आणतात.भाजी शिजवून देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो.नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून जेवतात.

माहित आहे का तुम्हाला ?
मकारसंक्रात हा सन हिवाळ्यात साजरा केला जातो.या दिवशी मित्र,नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात.तीळ हे या काळात होणारे महत्वाचे पीक आहे.थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ खाणे चांगले असते.
आपण काय शिकलो .
कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते.
कुटुंबाचे छोटे कुटुंब,मोठे कुटुंब,विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात.
अनेक पिढ्यांची वंशावळ तयार होते.
घरातील प्रत्येक छोटे-मोठे काम महत्वाचे असते.
आपले घर , परिसर स्वच्छ ठेवावा.
आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत/
सण-उत्सवामुळे लोकांत एकोप्याची भावना वाढते.
सण-उत्सवात आपण एकमेकांना भेटतो,एकमेकांशी बोलतो,आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या