सांगा पाहू.
दिवसा आपल्याला
परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात. मग रात्री तशा का दिसत नाहीत?
दिवसा सूर्याचा
प्रकाश मिलतो. त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी
स्पष्ट दिसतात. सूर्य मावळला की अंधार पडतो. प्रकाश अपुरा असतो.
रात्री आकाशात चांदण्या दिसतात, पण आजूबाजूच्या गोष्टी
स्पष्ट दिसत नाहीत.
दिवस आणि रात्र
यांचा सजीवावर परिणाम होतो.
सांगा पाहू.
निरीक्षण करून
वर्णन करा.
सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात ?
सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या
रंगांमध्ये कसकसे बदल होतात ?
सांगा पाहू.
सावली कशी दिसते ?
{IMAGE}
pg144
० सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ? ती लांब आहे की आखूड?
सूर्य डोक्यावर आला
की सावलीत काय फरक होतो ?
संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसते ?
० लांब सावल्या, आखूड सावल्या
सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगवण्यापूर्वी
पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सकाळी उन कोवळे असते. सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात.
सूर्य हळूहळू वर सरकू लागतो. सावल्या आखुड होऊ लागतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूंपच लहान
होतात.
सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो. सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा
दिसतात.
एरवी आकाश निळे दिसते.
माहित आहे का तुम्हाला?
निसर्ग जिथे सुंदर
असेल तेथील सूर्यास्त पहायला लोक मुद्दाम जातात. सातारा जिल्ह्यातील
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिदृध आहे.
तिथल्या एका जागेला 'सूर्यास्त पहाण्याची जागा' असेच म्हणतात. तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो.
महाबळेश्वरला गेलेले पर्यटक
संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट
देतात. नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात.
pg145
० पहाटेपासून रात्रीपर्यंत
रात्र संपत आल्याची
चाहूल पक्ष्यांना लागते. भल्या
पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो. जवलपास कोंबडा असेल, तर त्याचे आरवणे ऐकू येते.
पक्षी घरट्यातून बाहेर पड़तात. थव्याने उडू लागतात. त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो.
फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात. त्यांची फुले होतात. त्या
फुलांमध्ये गोड मकरंद असतो. तो गोळा
करण्यासाठी मधमाश्या येऊ लागतात. फुलपाखरे, मुंगे आणि इतर कीटक
फुलांभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात.
आपल्या परिसरातले लोक आपापल्या कामाला लागतात.
आपणही कामे आवरून शाळेच्या
तयारीला लागतो.
{Image}
pg146
। नवा शब्द शिका !
रवंथ - काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात. नंतर पोटातील अन्न
थोडे थोडे तोंडात आणून चघळतात. हे चघळलेले अन्न परत गिळताता त्याला रवंथ करणे म्हणतात. रवंथ केल्यामुळे या प्राण्यांना अन्न नीट पचते. गाई, म्हशी रवंथ करणारे प्राणी
आहेत.
निशाचर - काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात. अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पड़तात अशा प्राण्यांना निशाचर म्हणतात.
{Image}
गाई, म्हशींना गुराखी चरायला घेऊन
जातात. पोट भरले की ही जनावरे
निवांत ठिकाणी बसतात. रवंथ करू लागतात. सध्याकाळ झाली की गाईगुरे गोठ्यात परततात. पक्ष्यांचे थवेही घरट्याकडे निघतात. आपणही शाळेतून
घरी परत येतो.
पण काही निशाचर
सजीव मात्र सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात. पतंग, रातकिडे आणि काजवे याचा अशा प्राण्यामध्ये समावेश होतो. वाघ, वटवाघूळ, घुबड हेही निशाचर
प्राणी आहेत. रातराणी, निशिगंध अशी काही फुले रात्री
उमलतात.
{IMAGE}
pg147
करून पहा
जिथून आकाश स्पष्ट
दिंसेल अशी पोकळी जागा
शोधा.
एक आठवडा रोज
संध्याकाळी ठरावीक वेळी तिथे जा.
चंद्र रोज एकाच
ठिकाणी दिसतो का ?
चंद्राचा आकार रोज
तसाच दिसतो का ?
चंद्राच्या कला
चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते ठरावीक वेळी आकाशात चंद्र
शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. चंद्राचा
आकारही दररोज बदलतो.
{IMAGE}
ज्या दिवशी चंद्र
गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर
पंधरा दिवस तो लहान लहान होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्याना दिसत नाही. त्या दिवसाला अमावास्या म्हणतात.
अमावास्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा मोठा होत
जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो.
दररोज चंद्राचे जे
निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना
चंद्राच्या 'कला' म्हणतात.
pg148
आपण काय शिकलो
१)
सूर्य उगवला की
उजेड होतो, म्हणजेच दिवस होतो. सूर्य मावळला की अंधार होतो
म्हणजेच रात्र होते.
२)
सूर्य पूर्वेकडे
उगवतो आणि पश्चिमेकड़े मावळतो.
३)
सकाळी सावल्या पश्चिमेकड़े पडतात आणि
त्या लांब असतात. सूर्य डोक्यावर आला, की सावल्या खूपच
लहान होतात. संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब
होतात आणि पूर्वेकडे पड़तात.
४)
दिवस आणि रात्र
यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले
असते.
५)
चंद्राचा आकार आणि
उगवण्याची वेळ रोज बदलते.
चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात, त्यांना चंद्राच्या कला
म्हणतात.
६)
ज्या दिवशी चंद्र
पूर्ण गोल दिसतो, त्या दिवशी पौर्णिमा असते. ज्या दिवशी
चंद्र आकाशात दिसत नाही, त्या दिवशी अमावस्या असते.
हे नेहमी लक्षात ठेवा
दिवस आणि रात्र यांच्या
चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात. त्यामुळे ठरावीक वेळी ठरावीक कामे केली पाहिजेत.
Comments
Post a Comment