Skip to main content

९. पाणी नक्की येते कोठून



९. पाणी नक्की येते कोठून
सांगा पाहू
खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा. 
(
१) तुम्ही प्राणी कशातून पिता ?
(२) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ?
(३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ?
सांगा पाहू
पण हे पाणी कुठून येत असावे ? 
या प्रश्नाचे उत्तर आहे 'पाऊस'. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते.
० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ, ओढे, नद्या तयार झाल्या आहेत.
० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत.
० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते, त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते.
० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते.
० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केली आहेत. पाऊस कमी पडला, तर या ठिकाणांचे पाणी कमी होते. तुमच्या परिसरात, तालुक्यात किया जिल्ह्यात पाण्याची ठिकाणे तुम्ही पाहू शकता. सोबतचा जिल्हा
नकाशा 'अभ्यासा व त्यावरील कृती पूर्ण करा.
नदी कशी तयार होते व वाहते? . 
पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच  भागावरसुद्धा पडते.ते उताराच्या दिशेने वाहते
अशा पाण्यांचे असंख्य् ओहोळ एकत्र  येवून नदी तयार होते.
नदी, डोंगर द-या, पठार व मैदान यावरून वाहते.
जलरूपे : पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपाची उदाहरणे आहेत.झरा ओढा,नदी, नाले, जलाशय, खाडी, समुद्र, .  महासागर ही काही ज़लरूपे अहित
भूरूपे : उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला  वेगवेगळे आकार मिलतात. पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने,खिंड,दरी ही काही भूरूपे आहेत.
माहीत आहे का तुम्हाला : झरा कोठून येतो 
पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगांतून ते खोलबर झिरपते
० जमिमीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी भागाकडे वाहते. हे जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीखालून बाहेर पडते. यालाच आपण 'झरा' म्हणतो.
करून पहा.
एकसारख्या आकारांच्या तीन बाटल्या घ्या. एक बाटली पाण्याने पूर्ण भरा. समजा, की हे सर्व पाणी वापरणारे तुम्ही एकटेच आहात. म्हणजे संपूर्ण बाटलीभर पाणी तुम्हाला वापरता येईल.
आता दुसरी बाटली भरा. असे समजा, कीं हे पाणी तुमच्यासह वर्गातील आणखी एक मुलगा वापरणार आहे. पाण्याचे समान दोन भाग करा. आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले ते पाहा.
हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी होते की जास्त ते पहा.
आता तिसरी बाटली भरा. असे समजा, की हे पाणी तुमच्यासह वर्गातील चार मुले वापरणार आहेत. आता बाटलीतील गाण्याचे समान पाच भाग करावे लागतील. आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले हे पाहा. या वेळी पहिल्या व दुसन-या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की कमी ?
असे का झाले, याचा विचार करा.
काय करावे बरे     
राहुल आणि सगुणा खेळून अाल्यावर हातपाय धुतात, पाणी पितात, रोज सकाळी  अंघोल करतात, जेवण झाल्यावर ताट-वाटी धूतात.पण हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात. तेव्हा आईं त्यांना रागावते. त्यांना असा प्रश्न पडला की पाणी जपून कसे वापरावे.?
पाण्याचा जपून वापर करण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या सवयी त्यांना सूचवाल?
नेहमी लक्षात ठेवा
  पावसाचे पाणी साठवले तर...
मौसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे अाहेत.ती भारतात अाहेत. उन्हाळ्यात मात्र तिथे पाण्याची कमतरता असते.आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातही असेच घडते. याचे कारण म्हणजे पाणी साठवण्याचे उपाय केले जात नाही. पावसाचे पाणी साठबले तर ही समस्या दूर होईल.
जरा डोके चालवा
१. पावसाचे पाणी साठवले तर ते नंतर वापरता येईल का ? पावसाचे पाणी तुम्ही कसे साठवाल ?
२. फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला, तर इतर सजीबांचे काय होईल ?
माहीत आहे का तुम्हाला ?
दूर अंतरावरच्या विहिरी, तलाब, पाण्याच्या टाक्या येथून पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नळमार्गाचा वापर करतात.
पाणी काही ठिकाणी टॉंकरने अाणले जाते.
आपण काय शिकलो.
० आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. पावसामुळेच नदी, तलाव, झरे इत्यादी तयार होतात.
० नदीची सुरूवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते.
० पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...

२२. आपल्या गरजा कोण पुरवतात ?

खालील प्रश्नांची उ त्त रे द्या १. तुमचे वडील काय काम करतात ? २. तुमचे आजोबा को णते काम करायचे ? ३. मोठेपणी तु म्हाला काय व्हायला आवडेल ? मु लांनो व री ल चित्रे प हा व प्रश्नांची उ त्त रे द्या. १) यां पै कीं काही लोक तुम्ही न क्की च पहि ले असतील. त्यांची नावे सांगा. २ ) . यांपै की कोणकोण त्या लोकांशी तुमचा संबंध आ ला आहे ? ३) तुमच्या कोणत्या गरजा त्यां च्याकडून पुर्ण होतात ? हवा, पा णी, अन्न व निवारा या स र्व सजी वां च्या गरजा आहेत. त्या माण सांच्याहि गरजा आहेत, पण यांशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत. जसे, तुम् हा ला कपडे लागतात, मार्गदर्शक करण्यासाठी शिक्षक लागतात, घरी कोणी आजारी पाले, तर डॉक्टर लागतात. आपल्या विवि ध गरजा पुरवण्या साठी वेगवेग ळे लोक काम कस्तात. त्यांनी केले ल्या कामांमु ळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पुर्ण होतात. त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणतात. ० व्यव सायाचे प्रकार व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे प्रमुख चार भाग पड़ तात pg128 १. निसर्गावर आधारित व्यवसाय (उदा., शेती , मासेमारी इत्यादी-) २. उद्योग (उदा....