Skip to main content

१२. आपली अन्नाची गरज



सांगा पाहू

० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली, त्यानंतर ती कशामुळे सुधारली ?

सांगा पाहू
० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ?

आपल्याला भूक का लागते ?
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते.

पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही.

अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते.

जेव्हा आपण जास्त काम करतो, तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते.

आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते.

सांगा पाहू

० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ?
० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ?
० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का?

० सजीवांचे अन्न वेगवेगळे

० नवा शब्द शिका !

पेंड :
तीळ, शेंगदाणे, सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्हणतात.

आंबोण :
गूळ, धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवून ते मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ.

प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत.

गाई, म्हशी पालणारे लोक त्यांना गवत तर देतातच, पण. आँबोण आणि पेंड सुद्धा द्रेतात. घोड्याना गवताबरोंबर भिजवलेला हरबरा देतात.
शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरनिराळ्या झुडपांचा पालाही खातात. मांजरांना दूध मनापासून आवडते. पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात. मांज़रे, चिमण्या, कबुतरे, पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात.

कुत्र्यांना आपण पोळी , भाकरी देतो. पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते. मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस-मासळी खायला देतात.

जंगलात हरीण, नीलगाय, गवे असे प्राणी असतात. ते हिरवा पाला खाऊन राहतात.

जवळच्या शेतामध्ये पिके उभी असतील तर हे प्राणी पिकाचाही फडशा पाडतात.
जंगलात वाघ, सिंह असे प्राणीही असतात. ते इतर प्राण्याची शिकार करून त्याचे मास खातात.
असे हिंस्र प्राणी सहसा माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत, पण कधीकधी त्यांची उपासमार होते. त्यांमुळे त्यांना माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस करणे भाग पडते. अशा वेळी ते गोठयातील गुरे मारून खातात.

माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात, पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते. त्यांना गुरे मारणे अवघड जाते. कोल्हे बहुधा कोंबड्या पळवून नेतात.

जरा डोके चालवा.

० पिके तयार झाली की गोफणी का चालवाव्या लागतात ?बुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात ?

पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. अनेक पक्षी धान्यांचे कण खातात शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्ये, कडधान्ये अशी विविध पिके पिकवतो.  पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात. ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. त्यातून पिकांची नासाडी होते. अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात ?

माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. स्थामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात.

वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. कोंबड्या किड़े खातात  कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात. काही पक्षी झाडांची फळे खातात.

० अनेक छोटेछोटे प्राणी काय खात असतील बरे ?

ढेकूण माणसांचे रक्त शोषण करतात, तर गोचिडी गोठयातील ज़नावरांचे रक्त शोषण करतात.

पाली आणि सरडे किडे खातात. सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात. फुलपाखरे फुलांमधील रस शोधून आपली भूक भागवतात.

प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते.

 माहीत आहे का तुम्हाला ?

डासांचे अनेक प्रकार असतात. बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पर्तीमधील रसांचे शोषण करतात. फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात.

० वनस्यतींचे अन्न
वनस्पतींनासुद्धा अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल ? वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करू शकतात. वनस्पर्तीची मुळे जमिनीतून पाणी शोषुन घेतात. या पाण्यात ज़मिनीतील काही पदार्थ बिरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतीच्या पानापर्यत पोचते.
पानावर अनेक छोटीछोटीं छिद्रे असतात. ती खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाहीत. त्यांतून हवा पानांच्या आत शिरते. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानामध्ये एकत्र येतात. पानावर सूर्यप्रकाश पडला, की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात.

वनस्पर्तीचे अन्न पानामध्ये तयार होते. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते

आपण काय शिकलो.

सजीवांना अन्नाची गरज असते.
अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते, शरीराची वाढ होते, शरीराची होणारी झीज भरून निघते .

प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात.

वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी किडे खातात. काही कीटक वनस्पर्तीची पाने कुरतडून खातात.

वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात.

हे नेहमी लक्षात ठेवा

वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या