करून पहा
एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्याचा रंग पहा. पाण्याचा
रंग कोणता आहे ?
एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या. छान वास आला? आता पाण्याचा वास घ्या.
पाण्याला वास आला का ?
एखाद्या पिकलेल्या आंब्याची, चिकूची किंवा पेरूची चव घ्या. पिकलेले
फळ चवीला कसे वाटले ?
आता पाण्याची चव घ्या. पाण्याची चव कशी वाटली ?
शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही.
० नवा शब्द शिका
पारदर्शक पदार्थ : ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते, त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ
म्हणतात.
अपारदर्शक पदार्थ : ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ म्हणतात.
अपारदर्शक पदार्थ : ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ म्हणतात.
करून यहा
हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा अाहे
हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा अाहे
० एका स्टुलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा.
० ती एका पुठ्ठ्यातून बघा.
० तीच मेणबत्ती आता काचेतून बघा. तुम्हाला काय आढळून येईल?
० पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही ; पण काचेतून मेणबत्तीची ज्योत
दिसते.
यावरून काय उलगडते ?
० पुठ्ठा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे.
० आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा.
तुम्हाला काय आढळून येईल?
० पाण्यातून मेणबत्ती दिसते.
यावरून काय उलगडते?
पाणीही पारदर्शक आहे.
शुद्ध पाणी
रंग नसतो
वास नसतो
चव नसते
पारदर्शक असते.
करून पहा
एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या. दुस-या
भांड्यात थोडे पाणी घ्या. दोन बश्या घ्या. दोन काचेचे छोटे पेले घ्या.
एका बशीत थोडे पीठ टाका.
दुस-या बशीत थोडे पाणी ओता.
आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका. दुस-या पेल्यामध्ये थोडे पाणी
ओता.
तुम्हाला काय आढळून येईल.
बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होती पाणी मात्र भांड्याचा
किंवा पेल्याचा आकार घेते.
यावरून काय उलगडते
ज्या भांड्यात तुम्ही पाणी घ्याल, त्या भांड्याचा आकार पाणी घेते.
पाण्याला स्वत:चा आकार नसतो. म्हणूनच फरशीवर सांडले तर पाणी पसरते.
जरा डोके चालवा.
० तळ्यातले पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो. असे का?
उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना बादली पडली. पाणी सांडले. सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का की ते वाहून जाईल ?
उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना बादली पडली. पाणी सांडले. सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का की ते वाहून जाईल ?
पाणी असेही असते
ज्या भांड्यात ठेवू त्या सपाट भागावर पसरते
उतारावरून खाली वाहते
भांड्याचा आकार घेते.
उतारावरून खाली वाहते
भांड्याचा आकार घेते.
०पाण्याच्या तीन अवस्था
सांगा याहू
सांगा याहू
काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवले. थोड्या वेळाने त्या
बर्फाचे काय होईल ?
सांगा पाहू
पाणी तापत ठेवले. म्हणजे पाण्याला उष्णता दिली. ते जरा वेळाने उकळू
लागेल. काही वेळाने पाणी कमी झालेले दिसेल.
पाणी कमी का झाले?
एक झाकणी चिमट्याने पकडली. पाण्यातून येणा-या वाफेत धरली. काही
क्षणातच ती बाजूला घेऊन पाहिली. झाकणीच्या खालच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा
झालेले दिसतील.
हे पाण्याचे थेंब कुठून आले ?
पाणी खूप थंड केले की ते गोठते. म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो बर्फ
उघड्यावर राहिला की बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते. बर्फ वितळू लागताे
बर्फाचे पाणी होते. पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते.
भांड्यातील उकळणा-या पाण्याची वाफ झाली. म्हणून भांड्यातील पाणी
कमी झाले
वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते. पाण्यातून येणा-या वाफेत धरलेली
झाकणी गार होती. म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी
तयार झाले.
नवा शब्द शिका !
अवस्था :
एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो. ते रूप.
बाष्प :
हवेमध्ये पाण्याची वाफ असते, त्याला बाष्प म्हणतात.
आपण रोज जे पाणी वापरतो , ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे.बर्फ पाण्याची
स्थायुरूप अवस्था आहे.वाफ हि पाण्याची वायुरूप अवस्था आहे.
पाण्याच्या अवस्था.
स्थायुरूप (बर्फ )
द्रवरूप (पाणी)
वायुरूप (बाष्प)
करून पहा
गमतीचा प्रयोग
गमतीचा प्रयोग
० एक काचेचा पेला घ्या. स्वच्छ फडक्याने तो आतून, बाहेरून कोरडा करून घ्या.
० पेला कोरडा झाल्याची खात्री करा. आता पेल्यात बर्फाचे पाच-सहा तुकडे टाका.
० पेला कोरडा झाल्याची खात्री करा. आता पेल्यात बर्फाचे पाच-सहा तुकडे टाका.
तुम्हाला काय आढळून येईल
० पेला ज़र आतून ओला झाला तर त्यात नवल ते काय ? पण पेल्याची बाहेरची बाजूदेखील आपोआप ओलसर झालेली दिसते. आहे की नाही गंमत ?
० पेला ज़र आतून ओला झाला तर त्यात नवल ते काय ? पण पेल्याची बाहेरची बाजूदेखील आपोआप ओलसर झालेली दिसते. आहे की नाही गंमत ?
यावरून काय उलगडते ?
० पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते. आपण पेल्यात बर्फाचे
तुकडे टाक्ले. त्यामुळे पेला थंड झाला. पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली.
हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार आले आणि मेला बाहेरून ओलसर
झाला !
करून पहा
हे प्रयोग मोठ्या माणसांच्या परवानगीने, त्यांच्या समोर करायचा आहे.
भाक-या किंवा चपात्या करून झाल्या, के गरम तव्यावर तुम्हाला काय आढळून
येईल ?
तव्यावर शिपडलेले थेंब गोल होतात. बघता बघता नाहीसे होतात.
यावरून काय उलगडते ?
० तवा फार गरम असतो. तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबांची
लगेच वाफ होते.
जरा डोके चालवा.
० धुतलेले ओले कपडे चालत घातले की आपोआप कसे सुकतात.
॰ करून पहा
० एका काचेच्या पेल्यात थोडेसे पाणी घ्या.
० त्यात चिमूटभर मीठ टाका. चमच्याने ते ढवळा. तुम्हाला काय आढळून येईल?
० त्यात चिमूटभर मीठ टाका. चमच्याने ते ढवळा. तुम्हाला काय आढळून येईल?
आता पाण्यात मीठ दिसत नाही. चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर
घ्या. चव खारट लागते.
यावरून काय उलगडते ?
० चव खारट लागली. याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे. म्हणजेच मीठ पाण्यात विरघळले.
० चव खारट लागली. याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे. म्हणजेच मीठ पाण्यात विरघळले.
काही पदार्थ पाण्यात विरघळतात.
जरा डोके चालवा.
पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात त्यांची नावे सांगा.
पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात त्यांची नावे सांगा.
माहीत आहे का तुम्हाला ?
बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते. अनेकांकडे फ्रीज असतो. त्यामध्ये बर्फ तयार करता येतो. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात. रंग घालतात. नंतर ते प्राणी गोठवून याच पद्धतीने 'आइस फ्रुट' बनवतात.

आपण काय शिकलो
पाण्याला रंग, वास आणि चव नसते. पाणी पारदर्शक असते
पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते.
सपाट भागावर पाणी पसरते. उतारावरून खाली वाहते.
: पाणी है
स्थायुरूप, द्रवरूप
आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते.
पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात.
पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच. पण स्थायुरूप बर्फ आणि वायुरूप
बाष्प यांचेही आपल्याला अनेक उपयोग अाहेत.
Comments
Post a Comment