Skip to main content

3. निवारा आपला आपला



निवारा आपला आपला

 मांजर कशासाठी दबा धरून बसले अाहे?
० कावळे का घाबरले अाहेत ते मांजराला का हुसकावत आहेत ?

सागा पाहू
० पक्षी घरटी बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
० बिळात कोणकोणते प्राणी राहतात ?
० पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात ? त्यांची राहण्याची सोय कोण करते ?

० घराची गरज कशासाठी?
कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो.घरामुठठे चोरीची भीती कमी होते
काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. त्यांना जंगली  ज़नावरांचीही भीती असते. घरामुळे तीही कमी होते.
आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का ?

काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वत:साठी निवारा तयार करतात; तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात.
० नवा शब्द शिका !
निवारा : संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. उन, बारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा.
० स्वत:साठी निवारा बनवणारे प्राणी
पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वंत:साठी तयार केलेला निवाराच असतो.
 
अंडी खाणा-या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते.
अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वत:चे रक्षण करण्याइतकी ताकद पिंल्लांमध्ये नसते.घरट्यांमध्ये पिंल्लांचेही रक्षण होते. म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटे बनवश्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगलद्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात.

घरट्यासाठी पक्षी जागाही सोईची निवडतात. सुगरण पक्षी पहा ना ! घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झु्कलेल्या असतात. त्यांतल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणा-या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते.
शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करती जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दो-याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतों. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते.
काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वत: बनवतात. मधमाश्या झांडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात.
 
घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात.

घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरांमधेच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात; पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरांत निवा-यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरांत सहसा येत नाहीत कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही
परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी
काही प्राणी निवा-यासाठी स्वत: काहीच खटपट करत नाहीत. ते परिसरातलीच सोईची जागा निवा-यासाठी निवडतात. काही कबुत्तरे आणि ,पारवे जंगलात राहतात. काही उंच कडशांच्या छोट्या छोट्या कपारींत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या ज़वळही राहतात व भितीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात.
वाघ, बिबटे, तरस डोंगरांच्या गुहेत राहतात.

काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात, तर काही  प्रकारची वटवाघळे डोंगरांच्या अंधा-या गुहामध्ये राहतात
किंवा ती जुन्या पडक्या, ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात.

माहीती आहे का तुम्हाला ?
नाग वारूळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारूळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग बिळात राहतो.
 
 

 पाळीव प्राण्यांचा निवारा
काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात.

कोंबड्यांच्या निवा-याला खुराडे म्हणतात.
गाईंसाठी गोठा बांधतात.
घोड्यांच्या निवा-याला तबेला म्हणतात.

आपण काय शिक्लो
थंडी, वारा, ऊन, पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवा-याची गरज असते.
काही प्राणी स्वंत:चा निवारा स्वंत:च तयार करतात.

काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात.
काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो.

हे नेहमी लक्षात ठेवा
हौसे करिता प्राणी पिंजा-यात ठेवणे योग्य आहे का? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे.
हौसेकरिता प्राणी पिंजन्यात ठेवणे योग्य आहे का ? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे
(अ) काय करावे बरे
आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते, त्याचे कारण काय असेल ?ती पुन्हा वाढायला हवी.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी