Skip to main content

१७. सुंदर दात, स्वच्छ शरीर !



सांगा पाहू

० तुमच्या वर्गातल्या कितीजणांचे दात पडले आहेत ?
० ज्यांचे दात पडले आहेत त्यांना पुन्हा नवे दात येतील का?
० काही आजीचे किंवा। आजोबा चे सगळे दात पड़तात त्यांना पुन्हा नवे दात येतात का ?

० सुभाषच्या आजोबांची गोष्ट

आमच्या आळीतील सारी मुले संध्याकाळी खाली खेळायला आली होती.

सुभाष आला नव्हता. तो आजोबांच्या बरोबर दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता. तीन महिण्यापूर्वी आजोबांचे दात काढून टाकले होते. आज़ त्यांना नवीन कवळी मिळणार होती.

मोनिकाताईं म्हणाली, "अशी कवळी ख-यासारखी दिसते पण ते दात खोटे असतात. ”

पहिलीतंल्या अहमदने विचारले "नवीन कवळी कशासाठी ?माझ्या दादाचे दात पडले होते, पण त्याला सगळे दात परत आले. तसे सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का ?"

ते ऐकून सारेजण हसले.

मोनिकाताईने अहमदला समजावून सांगितले. "अरे, लहानपणी दात येतात ना, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते सातव्या आठव्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात. ते पडले तर पुन्हा येत नाहीत.
बाळू म्हणाला, "नाही आले, तर नाही आले. खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची ?

मोनिकाताई म्हणाली, "बाबू तू तिसरीत आहेस ना? तुझ्या वर्गातल्या दहा-बारा जणांचे तरी दात पडले असतील. तुझेंही दात पडले आहेत. दात पडले तर खाताना आणि बोलताना तास होतो ना.
बाळू म्हणाला, "हे मात्र खरे, भाज़लेले दाणे मला इतके आवडतात ! पण खाता कुठे येतात?
मेरी म्हणाली, "आणि बाळू 'श' म्हणू शकत नाही. पुढचे दात पडलेत ना ? 'श' म्हणायला गेला की शिट्टीच वाज़ते."
ते ऐकून पुन्हा एकदा सारेज़ण हसले.
मोनिकाताई म्हणाली, "आता समजले ना ? कायमच्या दातांची काळजी घेणे का गरजेचे असते."
तेवढ्यात सुभाष आणि आजोबा परत आले. आजोबा मुलांकडे पाहून हसले. त्यांच्या नव्या कवळीचे दात छान चमकत होते.
जरा डोके चालवा

म्हातारपणी खूप जणांचे दात पडतात. पण काही ज़णांचे कायमचे दात खूप आधी पडण्याचे कारण काय असावे?
दातांची काळजी

काहीही खाल्ले की तोंड धुवावे. चूळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरुन बोट फिरवावे खुळखुळून पाच-सहा वेळा चुळा भराव्यात.
नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात.

दातांना आणि जिभेला चिकटून बसतात. दातांमधील फटीमध्ये अडकतात. ते तसेच तोंडात राहिले तर कुज़तात. त्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो.

वारंवार असे होत राहिले, तर हिरड्या खराब होतात. हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरवात होते.

तीच घाण पोटात जाते. त्यामुळे पोटाचे विकार होतात. शिवाय कुजलेले अन्नकण तोंडात राहिले, कीं त्याचा परिणाम होऊन दात किडतात. हळूहळू दात हलायला लागतात आणि सरते शेवटी पडतात.

हे टाळायला हवे. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावेत. त्याबरोबर जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात .

दात घासण्यासाठी काहीजण कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्या वापरतात. काहीजण बाजारात मिळणारे दंतमंजन वापरतात, घरी तयार केलेली राखुंडी वापरतात. काही-जण ब्रश आणि पेस्ट वापरतात.

pg103

कडुलिंबाच्या, बाभळीच्या काड्या किया राखूंडी वापरल्याने दातांमधील फटी पूर्ण स्वच्छ होत नाहीत. शिवाय राखूंडी खरखरीत असते. काड्या कठीण असतात. त्यामुळे हिरड्यांना इजा होवू शकते.

ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्ट चा फेस होतो. त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते.

जरा डोके चालवा

० तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती ? का ?

खाण्याआधी हात का धुवायचे?

करुन पहा

० एक काचेचे चंचुपात्र घ्या. ते अर्ध भरेल इतके स्वच्छ पाणी त्यात ओता.
वर्गातील कोणाचाही एखाद्या विद्यार्थीला  अथवा विद्यार्थिनीला त्यात हात धुवायला सांगा.

० नंतर त्या विद्यार्थ्याचा अथवा विद्यार्थिनीचा हात पहा.

० त्या चंचुपात्रातील पाण्यात काही फरक पडला आहे का, तेही पहा.

तुम्हाला काय आढळून येईल ?

०  विद्यार्थीला अथवा विद्यार्थिनीला हात चंचुपात्रात धुतला होता. तो स्वच्छ झाला.

० चंचुपात्रातील पाणी थोडेसे गढूळ झाले.

० तुमच्या वर्गातील कुणीही हात धुतला असता तरी हेच आढळून आले असते. यातून काय उलगडते?
० दिवभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात.
म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

pg104
माहीत आहे का तुम्हाला.

० कुठे खरचटले, जखम झाली तर अनेकजण ज़खमेवर ओली माती लावतात पण ते चुकीचे आहे. त्यामुळे जखम चिघळू शकते जखमेत पू होऊ शकतो.

० शरीराची स्वच्छता

लक्षात ठेवा, आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो. घाणेरड्या हातांनी जेवण केले, तर ती घाण पोटात जाते. पोट बिघडते. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी आठवणीने हात स्वच्छ धुवावेत

जशी दातांची स्वच्छता ठेवणे जरुरीचे आहे, तशीच केसाची आणि नखाचीही स्वच्छता ठेवायला हवी.

पाच ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी. त्यासाठी रोज अंघोळ करायला पाहिजे. आठवड्यातून निदान एकदा तरी केस पुसले पाहिजेत.

स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात.

खरे हुशार कोण ?

० सकाळी झोपून उठल्यावर सगळेच दात घालून तोंड धुतात, पण झोपायच्या आधी देखील आठवणीने दात घासून तोंड धुतात ते सगळे खरे हुशार !

० जेवण झाल्यावर सगळेच हात धुतात, पण जेवायच्या आधी देखील आठवणीने हात धुतात ते सगळे खरे हुशार !

आपण काय शिकलो

लहानपणी जे दात येतात, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते सातव्या आठव्या वर्षी पडतात.
त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात.
कायमचे दात पडले तर पुन्हा दात येत नाहीत. म्हणून दातांची काळजी घ्यावी.
दात अस्वच्छ असतील तर तीच घाण पोटात जाते. त्यामुळे पोटाचे आजार होतात.
खेळताना, कामे करताना हात अस्वच्छ होतात. जेवताना तीच घाण पोटात जाते. त्यामुळे पोट बिघडते. म्हणून हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे.
केसांची,नखांची आणि ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी.

हे नेहमी लक्षात ठेवा

० आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवायला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी