Skip to main content

14.स्वयंपाक घरात जाउया.



सांगा पाहू

० चित्रात पु-या तयार करताना दाखवले आहे. पु-या तयार करण्यासाठी त्या तळताना त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जात आहे.

खाली दिलेली चित्रे बघु अशीच माहिती सांगा
सांगा पाहू
काही अन्नपदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते?
  • आपण कोणते अन्न पदार्थ न शिजवता खातो?
  • स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गँस वापरणे का सोयीचे जाते?

० अन्नपदार्थ कसे बनबतात ?

लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात. भाजीपाला फळे आणतात. अंडी, मांस, मासे आणतात. ल्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात.बरेचसे अन्मपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते. भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात. पु-या, भजी असे पदार्थ तळून करतात. त्यासाठी तेल किवा तूप वापरतात. मोदक, इडली असे पदार्थ वाफवून करतात.

पोळी, भाकरी हे पदार्थ भाजून करतात. अन्नपदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात, ते अधिक खमंग आणि रुचकर होतात.

pg82

सगळेच अन्नपदार्थ उष्णता देऊन खात नाहीत. काही पदार्थ आपण कच्चे खातो.फळे नेहमीच कच्ची, म्हणजे न शिज़वता बटाटा कधीकधी टोमटो, काकडी अशा काही भाज्याही आपण कच्च्या खातों. काकडीची क्रोशिंबीर, केळीचे शिकरण हे अन्नपदार्थ उष्णता न देताच करतात.

वीतील फरक अनुभवा

गंमत आहे ना

१. पापड भाजूनही खातात.तळूनही खातात.

एकाच प्रकारचे दोन पापड ध्या. एक भाजून ध्या. दुसरा तळून ध्या. दोघांच्या चवींत काय फरक पडतो ते पहा. तुम्हाला कोणता जास्त आवडला ?

२. दाणे भाजून खातात व कच्चेही खातात त्यामुळे दोन्होंच्या चवीत काय फरक पडतो ? तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात ?
कच्च्या बटाट्याची फोड व उकडलेल्या बटाट्याची फोड यांच्या चवीतील फरक क्रोणता ?

० उष्णता देण्याच्या निरनिराळया पद्धती

अन्नपदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात.

pg83

० नवा शब्द शिका !

ज्वलनशील पदार्थ : जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाना ज्वलनशील पदार्थ म्हणतात. कापूर ज़ळू शकतो, म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. पाणी जळू शकत नाही, म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही.

इंधन : उष्णता मिळण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोईस्करपणे वापरता येतो, त्याला इंधन म्हणतात. स्वयंपाकाचा गॅस,रॉकेल,दगडी कोळसा ही इंधनाची उदाहरणे आहेत . सर्वच ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत. जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात, त्यांनाच इंधन म्हणतात.

आजकाल अनेकजण स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात. हे इंधन वापरायला सोयीचे असते. गॅस पटकन पेटतो. त्याचा धूर होत नाही. गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो.

काही लोकांकडे चूली असतात. चुलींमध्ये लाकडाचे सरपण चापरतात. लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते. शिवाय लाकडांचा धुरपण होतो.

सरपण मिलावण्यासाठी झाडे तोडावी लागतात. त्यामुळे परिसराची हानी होते. काहीजण कोळशाची शेगडी वापरतात. कोळशापासूनही धूर होतो.

ज्यांच्याकडे लाकूड, कोळशासारखी धूर करणारी इंधने वापरतात, त्यांनी स्वयंपाक घराला खिंडक्या ठेवाव्यात. त्यामुळे उजेडही भरपूर मिलतो आणि धूर साचत नाही.

pg84

काहीजण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात. त्यासाठी स्टोव्ह वापरतात.

रॉकेलेला घासलेटही म्हणतात. बाजारात खाता विधिध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात. त्या वापरणे खूप सोईस्कर असते. काहीजण बायोगॅस वापरतात. सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ

शिजवणा-या सौरचुली वापरणारेही काहीजण आहेत.

आपण काय शिकलो .

  • अन्नपदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात. त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होतात.
  • उकळणे, वाफवणे, तळंणे, भाजणे या उष्णता देण्याच्या विधिध पद्धती आहेत.
  • कोशिंबीर,शिकरण हे काही पदार्थ उष्णता न देता तयार करतात.
  • इंधन वापरणे व त्या आचेवर स्वयंपाक करणे सोईंचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात.
  • वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यांसाठी उष्णता मिळवता येते.
हे नेहमी लक्षात ठेवा
लाकूड आणि लोणारी कोळसा इंधन म्हणून वापरल्यास परिसरातील झाडांची हानी होते.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी