Skip to main content

20 आपले समूहजीवन




० वरील दोन चित्रांत तुम्हाला काय फरक दिसतो? 
० तुम्हाला कोणाची सोबत आवडते ?
० कोणता खेळ खेळायचा, हे तुम्ही कसे ठरवता?
 आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते. घरात आपण आई-वडिलांबरोबर राहतो.
आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात. मित्र-मैत्रिर्णीना भेटलो नाही, तर आपल्याला करमत नाही. एवढेच काय मनीमाऊ आणि मोती कुत्रा दिसेनासे झाले, तरी आपण हिरमुसतो.
माणसांना समूहात राहायला आवडते. आपल्या कुटुंबात, शेजा-यामध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय.

परस्परावलंबी समूहजीवन

समूहजीवनाची गरज आपणा सर्वाना आहे. आपल्या आजूबाजूला मित्र-मैत्रिणी व इतर लोक नसतील, तर आपण कोणाशी बोलणार ? आपला आनंद,अडी-अडचणी कोणाला सांगणार ?
pg120
समूहात आपल्याला सोबत मिळते. सोबतीमुझे आपल्याला सुरक्षित वाटते. आपण एकमेकांना मदत करू शकतो. एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य. समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते. परस्पर सहकार्य हा समूहजीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते.

जरा डोके चालवा

शेतकरी नसतील तर,  शाला नसेल, तर .....,  दवाखाना नसेल,तर.....  कच-याचे ढीग साठून राहिले तर .....
आपल्या दैनदिन गरजा समूहामुळे पुर्ण होतात. समूहात शिक्षण, आरोग्यसेवा पुरवण्याच्या सोई निर्माण करता येतात. गरजा भागबण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात. त्याला आपण वस्तूचे उत्पादन म्हणतो. त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणे याला सेवा म्हणतात. गरजा पुर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात. त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात. एकच एक व्यक्ती सर्व वस्तूचे उत्पादन करू शकत नाही. सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शक्त नाही. आपले समूहजीवन असे परस्परावलंबी असते.

समूहजीवनासाठी नियम

समूहजीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते. आपण आपापसात अनेक व्यवहार करतो. ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने घालावी लागतात. त्यांना नियम म्हणतात. नियम पाळल्याने समूहजीवनात शिस्त येते.

pg121

सांगा पाहू

० खेळाला नियम का असतात ?

० नियमानुसार खेळण्याचे फायदे कोणते ?

० सांघिक खेळात सर्वात महत्त्चाची गोष्ट कोणती?

कोणताही खेळ खेळण्या पूर्वी खेळण्याचे नियम समजावून घेतले पाहिजेत. खेळाचे नियम सर्वासाठी सारखेच असतात. नियमांचे पालन सर्वच खेलाडूंनी करायचे असते त्यामुले खेळ सुरळीत चालतो.

अशाच प्रकारे समूहजीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे. आपल्या जीवनात खेळाला फार महत्वाचे स्थान आहे. खेलामुळे सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बाणतात. खेळात हार-जीत यांपेक्षा सहभाग, जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात. खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

खालील विधानांमधून समूहजीवनासाठी आवश्यक नियम शोधा. त्यांच्यापुढील चौकटींत बरोबर नियमांपुढे  अशी खुण करा.

० रांग तोडून बसमध्ये चढावे. । ।
० पांढ-या पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा.  
० दुखापत झाल्यास लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे। ।
० गळणाऱ्या नळाची ग्रामपंचायत किंवा तेथील स्थानिक शासनाला माहिती द्यावी
० तिकीट न काढता प्रवास करू नये.

काय करावे बरे ?
नियमांमुळे भांडण तंटे कमी होतात भेदभावाची शक्यता कमी होते.तुम्हाला काय वाटते?
हे नेहमी लक्षात ठेवा.
“एकएका साह्य करू| अवघे धरू सुपंथ ||”

आपण काय शिकलो
माणसाना समूहात राहायला आवडते
२ परस्पर सहकार्यं हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे.
३. आपल्या दैनदिन गरजा समूहामुळे पुर्ण होतात.
४. समूहजीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते.
५. खेळामुळे सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बाणतात.
६. खेळामुळे आरोग्य चांगले राहते.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह