Skip to main content

१९ .माझी शाळा




सुरेखा आणि मिहिर रोज़च्यापेक्षा लवकर उठले.

आई-वडिलांची मदत न देता पटपट आवरू लागले. शाळेत जाण्याची गडबड करू लागले. आईने विचारले, 'काय ग सुरेखा, आज काय एवढी घाई।

सुरेखा म्हणाली, 'आज माझ्या 'जीवन शिक्षण प्राथमिक शाळेचा' वाढदिवस आहे. आज आम्हाला खाऊ देणार आहेत. आम्ही कालच आमचा वर्ग स्वच्छ केला आहे वर्गाच्या स्वच्छतेची आणि सजावटीची स्पर्धा आहे. माझी शाळा मला खूप आवडते."

बाबा म्हणाले, 'मिहिर, आमच्या वेळी नव्हतं बुवा असं काही". मिहिर म्हणाला, "अहो बाबा, माझ्या वाढदिवसासारखाच शाळेचाही वाढदिवस. माझी शाळा खेळात, वेगवेगळ्या स्पर्धामध्येही सर्वप्रथम असते. आमच्या शाळेत ववतृत्व स्पर्धा होतात. खेळाच्या स्पर्धा घेतात. बाबा, प्रकल्प पूर्ण करणे, सहलींना जाणे, स्नेहसंमेलनात भाग घेणे या गोष्टी मी आवडीने करतो.

सांगा पाहू.
(१)तुमच्या गावातील शाळेची स्थापना केव्हा झाली आहे?
( २ ) तुम्ही तुमच्या शाळेचा स्थापनादिन कसा साजरा करता ?

( 3) शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात ?

माहीत आहे का तुम्हाला

आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. काही वर्षे ते तेथे राहुन शिक्षण घेत असत. नंतरच्या कालात गावामध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटांतील विद्यार्थी एकत्र येत असत. शिक्षक त्यांना शिकवत असत. विद्यार्थी जमिनीवर अक्षरे, आकडे गिरवत असत.या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती. इंग्रजांनी सध्याची शाळापदृधत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली.

शाळेतील बदल :
पूर्वी गावागावामध्ये शाळा भरायच्या. एखाद्या मोठ्या वडाखाली किंवा सावली देणा-या जागी विद्यार्थी जमायचे. एकच शिक्षक वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थीना शिकवायचे. यात पाढे, बेरीज, वजाबाकी, अक्षरओळख, हिशोब यांचा समावेश असायचा. इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी आजची शाळापदृधत सुरू केली. प्रगती करायची असेल, तर शिक्षणाला पर्याय नाही, हे आपल्याकडील लोकांच्या लक्षात आले. लोक स्वत:हून पुढाकार घेऊन मुलांना शाळेत पाठवू लागले० यातूनच आजच्या शाळा तयार झाल्या.
pg ११३
करून पहा.
शाळा आणि शिक्षण यांविषयी महान कार्य केलेल्या पुढील व्यक्तींची माहिती शिक्षक आणि पालक यांच्या कडून मिळवा.

pg114

माहीत आहे का तुम्हाला .

० सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतील मुलीची वार्षिक परीक्षा झाली, तेव्हा ती बघायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते. पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असता ती म्हणाली, "मला बक्षिसे नकोत, मला शाळेसाठी ग्रंथालय हवे." ही मुलगी रात्री उशिरापर्यंत्त घरी अभ्यास करायची. जोतीराव- सावित्रीबाईनी शाळेतील मुलामुलींना शेती व तंत्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.

'जण-गण-मन' हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे. त्यांनी बंगालमध्ये बोलपुर येथे एक शाळा सुरू केली. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलणारे पक्षी, निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची. या शाळेचे नाव 'शांति-निकेतन'. मुलांना ती शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत! गडबड, गोंधळ नाही.मोटारींचा आवाज नाही. टांग्याचा खडखडाट नाही. अशी ही शाळा झाडाखाली भरांयची. या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे. हस्तकला व ह्स्तव्यवसाय शिकवायचे. मुले स्वत:च नाटके बसवायची. गाणी गायची, नाचायची आणि त्याबरोबर नवनवे विषयही शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशांतूनही मुले शिकायला यायची. टागोरांना १९१३ मध्ये नोबल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली.

महात्मा गाधी याचे शिक्षणबिषयक विचार महत्त्वाचे आहेत. त्याच्या शिक्षणविचारात श्रमसंस्कार, स्वत: प्रयोग करून शिकणे अशा गोष्टीवर भर होता.

सांगा पाहू

० शाळेच्या मैद्रानावर कोणते खेळ खेळले जातात ?
० शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते ?
० त्यात तुम्ही कोणती मदत करता ?
० शाळेतील कोणकोणत्या उपक्रमात तुम्ही भाग घेता ?
० शाळेत तुम्ही कसे येता ?

शाळेत आपण नबनवीन गोष्टी शिकतो. कविता आणि गाणी म्हणतो. चित्रे काढतो. शाळेत आपल्याला खेळायलाही मिळते. खो-खो, कबड्रडी, लेजीम यांसारखे खेळ शाळेत खेळायला मिळतात. आपण नियमितपणे जायला हवे. शाळेत वेळेवर जाण्यामुझे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते.

आपली स्वच्छता कशी राखावी , हेही आपण शाळेत शिकतो.सार्वजनिक स्वच्छतेचे महत्वही शाळेमुळे समजते.वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

pg115
हे नेहमी लक्षात ठेवा

काही शाळामध्ये प्रत्येक वर्गातील २-३ विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात. वर्ग स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांना श्रमदानाची सवय लागते. शाळेबदृदल, वर्गाबदृदल आपुलकी निर्माण होते. तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का? नसल्यास वर्गाची स्वच्छता करण्यासाठी महिन्याभराचे वेळापत्रक तयार करा. सर्व विद्याथ्योंना त्यात सहभागी करा. स्वच्छ वर्गासाठी फिरती ढाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्रक देता येईल.

सागा पाहू

० पाण्याच्या टाकींज़वळ गर्दी व गडबड का झाली आहे ?
० शाळेतील सुविधाचा वापर करताना कोणते नियम पाळावेत ?
 ० शाल्लेतील शिस्तीच्या नियमांचा वापर आपण आणखी कोठे करू शकतो?
   आपणा सर्वांना शाळा आवडते. शाळेत वाचनालय, मैदान, संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात. आपण त्यांचा वापर करतो. या सुविधांचा लाभ सर्वाना देता आला पाहिजे ॰ त्या वापरताना आपण सर्वानी नियमांचे पालन करावे. सुविधांच्या वापरासाठी रांगेत उभे राहावे. वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत. पुस्तकांची पाने फाडू नयेत व ती खराब करू नयेत. वर्गातील बाक व भिती स्वच्छ ठेवाव्यात. खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवावे.
सांगा पाहू
० मित्र-मैत्रीणिमध्ये वाद का निर्माण होतात ?
 ० वाद शाततेने मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल ?
० ज्यांच्याबरोबर बाद झाला आहे, त्याच्याशी वाद मिटल्यानंतर कसे वागाल ?
० वाद सोडवण्यास शिक्षकांची मदत घ्याल का?


pg116
आपल्या मित्र-मैत्रीणीबरोबर आपले वाद होऊ शक्तात, परंतु ते समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. वादांतील सर्वाना आपले म्हणणे सांगण्याची संधी असावी. वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये. वाद मिटले नाहीत, तर शिक्षकाची मदत घ्यावी. शांततेने बाद मिटबण्याची सवय उपयुक्त असते. या सवयीमुळे आपल्याला समूहजीवनातील प्रश्न समजुतीने सोडवता येतात. समुहजीवनातील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले, तर आपल्या अनेक समस्या दूर होतात.

सांगा पाहू.
तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी मुले आहेत का ? ती शाळेत का जात नाहीत.
  प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे.शाळा सर्वांसाठी असते. शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून-मिसळून राहण्याची सवय होते. विधिध लोकांशी आपला परिचय वाढतो. आपण समाजाचा भाग आहोत, याची जाणीव शाळेत होते.

 माहीत आहे का तुम्हाला ?

१४ वर्षे वयाखालील मुलामुलीनी कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. २००६ साली शोषणा विरुद्धचा हक्क अधिक व्यापक करत सर्वप्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.

आपण काय शिकलो

·         वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राह्रते.
·         आपणा सर्वाना शाळा आवडते.
·         समृहजीवनातील आपले प्रश्न व वाद समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत.
·         प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...