Skip to main content

१३. आपला आहार




राजूच्या घरी
बाबा : चला. जेवायला बसू. पण राजू-दिसत नाही तो ? नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो.
आई : त्याला थोडा ताप आहे. मघाशीच भी त्याला मऊ दहीभात दिला होता. आता जरा त्याचा डोळा लागला अाहे.
बाबा : मग झोपूदे त्याला. आपण जेवायला सुरुवात करायची का ?
ताई : लगेच बसूया. मला खूप भूक लागली अाहे. आज़ शाळेत लंगडीची मँच होती. मी मॅच खेळून आले आहे. 
आई : ये. बैस लगेच. 
ताई : आई, कोबीची भाजी कशाला ग केलीस?तुना माहिती आहे ना मला आवडत नाही ? मला नको बाई !
आई : ताई, असे बोलू नये, बाल. प्रकृती धडधाकट रहायला हवी की नको ? मग सगळे पदार्थ नको का खायला ? आणि ताटात काहीही टाकायचे नाही.
ताई : बरोबर आहे. शाळेत देखील बाई नेहमी हेच सांगतात. भी ताटात भाजी टाकणार नव्हते. 
बाबा : आता कसे शहाण्यासारखे बोललीस.
ताई : काबा, हे काय ? तुम्ही एकच भाकरी घेतलीत ? तुमचे पोट कसे भरणार ?
आजोबा : तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो. भूक लागणार कशी ? आम्ही अंगमेहनतीची कामे करत होतो.
एका वेळी चार-चार भाक-या फस्त करत होतो. आता माझे वय झाले अाहे पहिल्यासारखी भूक लागत नाही.
आजी : मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही.
आई : हो ना! सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे! सासूबाई, तुमच्यासाठी अर्थी भाकरी कुस्करून दुधात कालवून ठेवली आहे.
pg75
सांगा पाहू 
० राजूला आईने मऊ दहीभात का दिला ? 
० ताईंला खूप भूक कशामुळे लागली होती ? 
० बाबांना एकच भाकरी का पुरते ? 
० आजी आणि आजोबा कमी का खातात ?
नवा शब्द शिका !
आहार : रोजच्या रोज दोन वेळच्या जेवणात 
आपण काही अन्नपदार्थ खातो शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेस खातों. याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत भी पेयपदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ आपल्या पोटात जातात, त्या सर्वांना मिळून 'आहार' म्हणतात.
० आहार जास्त किंवा कमी का होतो ?
एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते. तेव्हा आपण भरपूर जेवतो. त्या दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो. त्या दिवशी आपला आहार कमी असतो.
सांगा पाहू
या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल? का ?
काई तरूण आहे , त्यामुळे किचा आहार जास्त आहे. याऊलट आजी म्हातारी आहे, त्यामुळे तिचा आहार कमी आहे.
pg76
काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला भरपूर कष्ट पडतात. अशी कामे अंगमेहनतीची कामे होत. अंगमेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते.
काही कामे एका जागी बसून करायची असतात. ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत. अशा कामांना बैठी कामे म्हणतात. बैठी कामे करणा-यांची भूक त्यामानाने कमी असते.
अंगमेहनतीची कामे करणा-या व्यक्तीचा आहार जास्त असतो. त्यांना अधिक अन्नाची गरज असते
माहीत आहे का तुम्हाला ?
पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून-पुसून काढणे ही अंगमेहनतीचीच कामे आहेत. ही कामे करणा-या व्यक्तीना भूक जास्त लागते.
ही कामे करणारी व्यक्ति स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते.
माहीत आहे का तुम्हाला ?
मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते. म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा.
pg77
सांगा पाहू
० एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकांच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का ? 
० रोज तेच तेच जेवण बनवले, तर तुम्हाला आवडेल का ? 
० आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत ?
० अन्नपदार्थातील विविधता
भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो. त्यावरून आहार थोडा अहि की जास्त हे ठरते. ही झाली आहाराविषयी एक माहिती.
आपण कोणते अन्नपदार्थ खातो ही माहितीपण घ्यायला हवी. म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल.
निरनिराळ्या लोकांच्या आहारांत निरनिराळे अन्नपदार्थ असतात.
त्याची कारणे कांय असतील ?
एका घरात रोज ठरावीकच पदार्थ बनवले गेले, तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागत्तील. जेवण कंटाळवाणे होईल. म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात.
जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते, तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते. कांही भागांत गहू जास्त पिकतो. त्या भागात गव्हाची पोळी खातात. समुद्रात मासळी भरपूर मिळते. म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते.
pg78
वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात.त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो.
एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात.सणासुदीच्या दिवशी गोडधोड जेवण करतात.
० आपण काय काळजी घ्यायची
प्रकृती चांगली हवी असेल तर अाहाराविषयी काळजी घ्यावी लागते.
म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत.
न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत, असे करू नये.
मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात.
अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे.
वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात. अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात. ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. ते पदार्थ चवदार असतात. आकर्षक
वेष्टणात मिळतात, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही.
आपण काय शिकलो
·         दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ पोटात जातात, त्या सर्वांना मिळून 'आहार' म्हणतात.
·         वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत.
·         त्रुतुमानाप्रमाणे मिळणा-या अन्नपदार्धामुळे आहारात बदल होतात.
·         वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात. स्थामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते.
·         आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात.
·         जाहिराती मध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही.
हे नेहमी लक्षात ठेवा
प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायला हवी.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी