Skip to main content

10.पाण्याविषयी थोडी माहीती



करून पहा
एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्याचा रंग पहा. पाण्याचा रंग कोणता आहे ?
एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या. छान वास आला? आता पाण्याचा वास घ्या. पाण्याला वास आला का ?
एखाद्या पिकलेल्या आंब्याची, चिकूची किंवा पेरूची चव घ्या. पिकलेले फळ चवीला कसे वाटले ?
आता पाण्याची चव घ्या. पाण्याची चव कशी वाटली ?
शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही.
० नवा शब्द शिका
पारदर्शक पदार्थ : ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते, त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात.
 
अपारदर्शक पदार्थ : ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ म्हणतात.
करून यहा 
हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा अाहे
० एका स्टुलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा.
० ती एका पुठ्ठ्यातून बघा.
० तीच मेणबत्ती आता काचेतून बघा.  तुम्हाला काय आढळून येईल?
० पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही ; पण काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते.
यावरून काय उलगडते ?
० पुठ्ठा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे.
० आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा.
तुम्हाला काय आढळून येईल?
पाण्यातून मेणबत्ती दिसते.
यावरून काय उलगडते?
 पाणीही पारदर्शक आहे.
शुद्ध पाणी
रंग नसतो
वास नसतो
चव नसते
पारदर्शक असते.
करून पहा
एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या. दुस-या भांड्यात थोडे पाणी घ्या. दोन बश्या घ्या. दोन काचेचे छोटे पेले घ्या.
एका बशीत थोडे पीठ टाका.
दुस-या बशीत थोडे पाणी ओता.
आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका. दुस-या पेल्यामध्ये थोडे पाणी ओता.
 तुम्हाला काय आढळून येईल.
बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होती पाणी मात्र भांड्याचा किंवा पेल्याचा आकार घेते.
यावरून काय उलगडते
ज्या भांड्यात तुम्ही पाणी घ्याल, त्या भांड्याचा आकार पाणी घेते.
पाण्याला स्वत:चा आकार नसतो. म्हणूनच फरशीवर सांडले तर पाणी पसरते.
जरा डोके चालवा.
० तळ्यातले पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो. असे का?
उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना बादली पडली. पाणी सांडले. सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का की ते वाहून जाईल ?
पाणी असेही असते
ज्या भांड्यात ठेवू त्या सपाट भागावर पसरते
उतारावरून खाली वाहते 
भांड्याचा आकार घेते.
०पाण्याच्या तीन अवस्था 
सांगा याहू
काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवले. थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल ?
सांगा पाहू
पाणी तापत ठेवले. म्हणजे पाण्याला उष्णता दिली. ते जरा वेळाने उकळू लागेल. काही वेळाने पाणी कमी झालेले दिसेल.
पाणी कमी का झाले?
एक झाकणी चिमट्याने पकडली. पाण्यातून येणा-या वाफेत धरली. काही क्षणातच ती बाजूला घेऊन पाहिली. झाकणीच्या खालच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील.
हे पाण्याचे थेंब कुठून आले ?
पाणी खूप थंड केले की ते गोठते. म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते. बर्फ वितळू लागताे बर्फाचे पाणी होते. पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते.
भांड्यातील उकळणा-या पाण्याची वाफ झाली. म्हणून भांड्यातील पाणी कमी झाले
वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते. पाण्यातून येणा-या वाफेत धरलेली झाकणी गार होती. म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार झाले.
नवा शब्द शिका !
अवस्था :
एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो. ते रूप.
बाष्प :
हवेमध्ये पाण्याची वाफ असते, त्याला बाष्प म्हणतात.

आपण रोज जे पाणी वापरतो , ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे.बर्फ पाण्याची स्थायुरूप अवस्था आहे.वाफ हि पाण्याची वायुरूप अवस्था आहे.
पाण्याच्या अवस्था.
स्थायुरूप (बर्फ )
द्रवरूप (पाणी)
वायुरूप (बाष्प)
करून पहा
गमतीचा प्रयोग
० एक काचेचा पेला घ्या. स्वच्छ फडक्याने तो आतून, बाहेरून कोरडा करून घ्या. 
० पेला कोरडा झाल्याची खात्री करा. आता पेल्यात बर्फाचे पाच-सहा तुकडे टाका.
तुम्हाला काय आढळून येईल
० पेला ज़र आतून ओला झाला तर त्यात नवल ते काय ? पण पेल्याची बाहेरची बाजूदेखील आपोआप ओलसर झालेली दिसते. आहे की नाही गंमत ?
यावरून काय उलगडते ?
० पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते. आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाक्ले. त्यामुळे पेला थंड झाला. पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली. हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार आले आणि मेला बाहेरून ओलसर झाला !
करून पहा
हे प्रयोग मोठ्या माणसांच्या परवानगीने, त्यांच्या समोर करायचा आहे.
भाक-या किंवा चपात्या करून झाल्या, के गरम तव्यावर तुम्हाला काय आढळून येईल ?
तव्यावर शिपडलेले थेंब गोल होतात. बघता बघता नाहीसे होतात.
यावरून काय उलगडते ?
० तवा फार गरम असतो. तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबांची लगेच वाफ होते.
जरा डोके चालवा.
० धुतलेले ओले कपडे चालत घातले की आपोआप कसे सुकतात.
॰ करून पहा
० एका काचेच्या पेल्यात थोडेसे पाणी घ्या.
० त्यात चिमूटभर मीठ टाका. चमच्याने ते ढवळा. तुम्हाला काय आढळून येईल?
आता पाण्यात मीठ दिसत नाही. चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या. चव खारट लागते.
यावरून काय उलगडते ? 
० चव खारट लागली. याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे. म्हणजेच मीठ पाण्यात विरघळले.
काही पदार्थ पाण्यात विरघळतात.
जरा डोके चालवा. 
पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात त्यांची नावे सांगा.
माहीत आहे का तुम्हाला ?
बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते. अनेकांकडे फ्रीज असतो. त्यामध्ये बर्फ तयार करता येतो. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात. रंग घालतात. नंतर ते प्राणी गोठवून याच पद्धतीने 'आइस फ्रुट' बनवतात.
आपण काय शिकलो
पाण्याला रंग, वास आणि चव नसते. पाणी पारदर्शक असते
पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते.
सपाट भागावर पाणी पसरते. उतारावरून खाली वाहते.
: पाणी है स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. 
पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच. पण स्थायुरूप बर्फ आणि वायुरूप बाष्प यांचेही आपल्याला अनेक उपयोग अाहेत.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...