Skip to main content

परिपाठ १७ डिसेंबर २०१५

आजचा परीपाठ
दि१७/१२/०१५
✳♈🍀❇❇
संकलन
बालचंद चौधरी प्र प्रमुख
९५४५२३८१०२
म,रा,प्रा शिक्षक संघ
शाखा वैजापुर ❇✳♈🍀
आजचे पंचाग
❇✳♈🙏🙏
सेवानिवृत्त दिन
गुरुवार, मार्गशीर्ष, शु. ६
नक्षत्र: शततारका चंद्रराशी: कुंभ
योग: वज्र करण: गर
सूर्योदय: 7.06 सूर्यास्त: 18.03
♈🍀✳❇

दिनविशेष
♈✳❇🍀
१९७० - जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१ - दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
१९२८ - भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९२७ - हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
१७७७ - फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
१७१८ - ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
१९७८ - रितेश देशमुख – अभिनेता
१९७२ - जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
१९४७ - दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
१९२४ - गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक
१९११ - डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
१९०५ - मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
१९०१ - यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१९०० - मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ
१८४९ - लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्कांसकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.
१७७८ - सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्कञरणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौति�
♈❇✳🙏🍀💐

// समुहगित
///✳❇🍀🙏💐
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥

वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥

हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥

करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥

या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥

ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥
///➖➖➖➖➖➖
प्रार्थना
🙏🍀💐
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
🙏💐🍀📙

आजचे थोरव्यक्ति
✳❇♈🙏💐
भगतसिंग
❇✳♈
२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.
💐✳❇♈

बालगित
♈❇✳📙
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

🍀🙏🍀💐🍀🍀

आजचे बडबडगित गीत
❇❇✳♈💐🙏
शेतकरीदादा तुमचं चाललंय काय?

कांही नाही

मग गहू पेरा भराभरा

पाउसभाऊ तुमचं चाललंय काय?

कांही नाही

मग पाउस पाडा भराभरा

गाडीवाले दादा तुमचं चाललंय काय?

काही नाही

गहू आणा घरा भराभरा

सुपलीबाइ तुमचं चाललंय काय?

काही नाही

मग गहू पाखडा भराभरा

जातेदादा तुमचं चाललंय काय?

काही नाही

मग गहू दळा भराभरा

चाळणीबाई तुमचं चाललंय काय?

काही नाही

मग चाळा गहू भराभरा

परातबाई तुमचं चाललंय काय?

काही नाही

मग पीठ मळा भराभरा

लाटणेराव तुमचं चाललंय काय?

काही नाही

मग पोळ्या लाटा भराभरा

तवेदादा तुमचं चाललंय काय?

काही नाही

मग भाजा पोळ्या भराभरा

ताटोबा तुम्ही करताय काय?

काही नाही

मग वाढा पोळ्या भराभरा

मग मी आता करू काय?

करतो करतो

तूप पोळी खातो भराभरा !!♈✳❇🍀

आजचि बोधकथा
✳♈🍀❇
दुदैवि जोडपे
👍♈✳✳
एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवर्‍याशी भांडत असे. एकदा ती माहेरी गेली होती. तेथून परत आल्यावर नवर्‍याने तिला विचारले. 'तू तिथे मजेत होतीस ना ?

तेव्हा बायको म्हणाली, 'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही. तिथली गडीमाणसं सुद्धा मला कंटाळली होती, असं त्याच्या चेहेर्‍यावरून वाटत होतं !'

त्यावर तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणार्‍या गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन ?'

तात्पर्य
🍀✳♈

- आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.
🍀❇♈✳🙏

आजचा सुविचार
❇♈✳💐🙏🍀
शिखर तक पहुँचने के लिए ताकत चाहिए होती हैं, चाहे वो माउंट एवरेस्ट का शिखर हो या आपके पेशे का| अब्दुल कलाम

❇✳♈🍀🍀

आजचि म्हण
❇♈✳🍀
काका मामांनी भरला गांव,पाणी प्यायला कोठे जाव?.
❇✳♈🍀

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी